कोपरगांव प्रतिनिधी, दि. १५ : नाशिक पदवीधर मतदार संघाचे अपक्ष आमदार सत्यजित सुधीर तांबे यांनी नुकतीच संजीवनी उद्योग समुहास भेट दिली त्याबददल त्यांचा जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या हस्ते, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यांत आला.
प्रारंभी जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत अहमदनगर जिल्हयाचे युवा नेतृत्व सत्यजीत तांबे यांनी अतिशय कौशल्यपूर्ण अंमलबजावणीतुन निवडणुक हाताळून मोठी विजयश्री खेचुन आणली त्याबददल त्यांचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे.
वडील तत्कालीन आमदार डॉ सुधीर तांबे यांना विधीमंडळ कामकाजाचा तीन पंचवार्षीक निवडणुकीचा अनुभव आहे. नाशिक पदवीधर मतदार संघातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांची सोडवणुक करण्यासाठी डॉ सुधीर तांबे यांनी केलेले काम सर्वांनाच प्रेरणादायी आहे. नवनिर्वाचित आमदार सत्यजीत यांनी वडीलांच्या संस्कारातुन व त्यांच्या अनुभवातुन नाशिक पदवीधर मतदार संघातील उर्वरित शिक्षकांच्या समस्या प्रामुख्याने मार्गी लावून यशस्वीपणे काम करावे.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते दत्तात्रय कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संचालक विश्वासराव महाले, आप्पासाहेब दवंगे, निवृत्ती कोळपे, त्रंबकराव सरोदे, बापूसाहेब बारहाते, साईनाथराव रोहमारे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, संजीवनी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रदिप नवले, माजी सभापती मच्छिंद्र टेके, मच्छिंद्र केकाण, शिवाजीराव वक्ते,
शेतकरी सहकारी संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अंबादास देवकर, उपाध्यक्ष बाजीराव वेणुनाथ मांजरे, माजी अध्यक्ष संभाजीराव गावंड, माजी उपाध्यक्ष विलासराव कुलकर्णी, माजी पंचायत समिती सदस्य बबनराव निकम, नानासाहेब थोरात, माजी संचालक राजेंद्र भाकरे, संग्राम देशमुख, अक्षय घुले यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते, शेतकरी सहकारी संघाचे नवनिर्वाचित सर्व संचालक, सभासद शेतकरी, उपस्थित होते. शेवटी संचालक विश्वासराव महाले यांनी आभार मानले.