कोपरगाव पिपल्स बँकेच्या अध्यक्षपदी राजेंद्र शिंगी

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२५ : कोपरगाव पिपल्स को-ऑप. बँकेच्या अध्यक्षपदी राजेंद्र मोतीलालजी शिंगी यांची एकमताने निवड करण्यात आली. दि. २४/११/२०२३ रोजी कोपरगाव येथील सहकार खात्याचे सहाय्यक निबंधक ठोंबळ साहेब यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या सभेत वरील निवड करण्यात आली. अध्यक्ष पदाची सुचना धरमकुमार माणकलाल बागरे यांनी मांडली त्यास कल्पेश जयंतीलाल शहा यांनी अनुमोदन दिले. चेअरमन पदा करीता एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे ठोंबळ साहेब यांनी जाहीर केले.

अध्यक्ष राजेंद्र शिंगी हे गेल्या १४ वर्षापासुन बँकेच्या संचालक पदावर कार्यरत असुन त्यांनी या कालावधीत बँकेचे उपाध्यक्षपदही भुषविलेले आहे. एकंदरीत बँकींग क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीमत्व लाभल्यामुळे यापुढील काळातही त्यांच्या अनुभवाचा बँकेस निश्चित फायदा होईल असे गौरउद्गार मावळते चेअरमन कैलासशेठ ठोळे यांनी काढले. तत्पूर्वी कैलासशेठ ठोळे यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीचा आढावा घेण्यात आला.

बँकेचे सर्व संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग यांना सोबत घेऊन बँकेच्या चेअरमनपदाची धुरा अत्यंत उत्तमरितीने पेलून बँकेची विश्वासार्हता अधिक बळकट करण्यात ते यशस्वी झाले. बँकेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक यांचा त्यांच्यावरील विश्वास तसेच वेळोवेळी घेतलेले बँकेचे धोरणात्मक निर्णय यामुळे बँकेच्या प्रगतीत मोलाची भर पडली. सभासद, ठेवीदार, कर्जदार यांचे बरोबरच सेवकांचे प्रश्नही सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

बँकेचे नुतन चेअरमन यांनी यावेळी सांगितले की, बँकेच्या संचालकानी जो माझ्यावर विश्वास दाखवुन चेअरमन पदाची जबाबदारी सोपविली आहे. ती आम्ही सर्व संचालक मंडळ यशस्वीपणे पार पाडू व सध्याच्या स्पर्धेच्या काळात नवनवीन टेकनॉलॉजीचा वापर करून ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल व बँकेच्या प्रगतीची यशस्वी घोडदौड कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी झालेल्या सभेत बँकेचे व्हा. चेअरमन भाऊसाहेब लोहकरे संचालक रविंद्र लोहाडे, अतुल काले, सत्येन मुंदडा, सुनिल बंब, रविंद्र ठोळे, दिपक पांडे, सुनिल बोरा, हेमंत बोरावके, वसंतराव आव्हाड, संचालीका प्रतिभा शिलेदार, त्रिशला गंगवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक एकबोटे हे उपस्थित होते. संचालक अतुल काले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. सुत्रसंचालन असि. जनरल मॅनेजर जितेंद्र छाजेड यांनी केले.