प्राचीन देवस्थानांचा जीर्णोद्धारासाठी डॉ. प्रशांत भालेराव यांचा पुढाकार

शेवगाव प्रतिनिधी, दि. १७ : दुर्लक्षित झालेल्या प्राचीन देवस्थानांचा जीर्णोद्धार व्हायला हवा. आपण संघटित होऊन आपल्या हिंदू संस्कृतीचे रक्षण करायला हवे. हिंदू संस्कृती जगात सर्वश्रेष्ठ अशी प्राचीन संस्कृती असून विविध देवस्थाने या संस्कृतिरक्षणांची केंद्रे होती हा इतिहास आहे. म्हणून देवालयांचा जीर्णोद्धार व्हायला हवा मात्र तेथील पावित्र्य जपून रोजच्या रोज होणाऱ्या पूजा, अर्चा, स्वच्छता आदि व्यवस्थांचेही नियोजन अगोदर व्हायला हवे अशा सूचना श्री रेणुका मल्टिस्टेटचे प्रवर्तक, ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. प्रशांत भालेराव यांनी येथे दिल्या.

       श्रीक्षेत्र अमरापूर येथील प्राचीन मारुती मंदिर जीर्णोद्धाराचा प्रारंभ आज मोठया उत्साहात भालेराव व हनुमान टाकळीचे महंत रमेश आप्पा महाराज यांचे शुभ हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

      यावेळी महंत रमेश आप्पा महाराज यांनी, एकाच शिळेवर समोरून मारुती तर मागील बाजूने श्री गणेशाची मूर्ती असलेले हे  देवालय प्राचिन असल्याच्या खुणा आहेत. हे श्री हनुमान रायाचे जाज्वल्य रूप आहे. असे सांगून या देवालयाच्या  जिर्णोद्धाराचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे. ही समर्थ चरणी प्रार्थना करून आप्पा महाराजांनी स्वतः अकरा हजार रुपयाची मदत जाहीर केली.

     बाळासाहेब चौधरी व डॉं अरविंद पोटफोडे यांचीही भाषणे झाली. यावेळी काशिनाथ पाटील गरड, सुखदेव कराळे, ज्ञानदेव सुसे, नाथा आरसडे, रवींद्र बोरुडे, आजिनाथ गरड, माजी सरपंच विजयपूर पोटफोडे, नितीन आरसडे, गणेश बोरुडे यांचे सह ग्रामस्थ उपास्थित होते.

सुयोग देवा भालेराव, बंडू जोशी, अनिरुद्ध महाजन, रवींद्र जोशी, दीपक भापकर, सुरेश आरसडे यांनी कार्यासाठी मोठे योगदान दिले. महेश लाडणे यांनी सुत्रसंचलन केले. गणेश गरड यांनी आभार मानले.