हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलचे त्वरित निलंबन करा – लहुजी सेनेची मागणी 

शिर्डी प्रतिनिधी, दि. ६ : साईबाबाच्या नगरीत दि. 3 फेब्रुवारी रोजी झालेल्या दुहेरी हत्याकांडात नांदूरखी येथील सुभाष साहेबराव घोडे यांच्यावर हल्ले खोरांनी हल्ला करून जखमी केले. जागेवरच ते रक्तबंबाळ होऊन गतप्राण झाले, मात्र त्या ठिकाणी पहाणीला आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांने सदर जखमी व्यक्तीकडे पाहून हा अपघात झाला आहे, म्हणून जाऊद्या असा हलगर्जीपणा करून तेथून कोणतीही माणुसकी न दाखवता सुभाष घोडे यांना रुग्णालयात नेले नाही अशा हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलचे त्वरित निलंबन करावे अशी मागणी भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला यांना केली आहे.

पुढे म्हंटले आहे की, माथेफिरू शिर्डीत वेगवेगळ्या तीन ठिकाणी हल्ले करून दोघांचा जीव घेतात तर एकाला गंभीर जखमी करतात अशा परिस्थितीत रात्रीची गस्त घालणारी पोलीस गाडी पोहेगाव येथे रात्रभर मांस पकडण्याचे काम करीत होती. हीच पोलिस गाडी या रोडवर गस्त घालत असती तर या दोन निष्पाप लोकांचा बळी गेला नसता असेही बाळासाहेब बागुल यांनी या मागणी मध्ये म्हंटले आहे. तर सुभाष घोडे व नितीन शेजूळ या मयत व्यक्तीच्या मुलांना राज्य सरकारने त्वरित मदत करावी आणि या गुन्ह्यात सापडलेल्या आरोपींना कडक शिक्षा होण्यासाठी सदर खटला जलद गतीने न्यायालयात चालविण्यात यावा.

साई संस्थानने कुटुंबातील प्रमुख व्यक्ती गेल्याने या दोन्हीही मयत कर्मचाऱ्यांच्या वारसाला संस्थान सेवेत सामावून घ्यावे असेही मागणी बाळासाहेब बागुल यांनी केली असून वरील मागण्या पूर्ण न झाल्यास आणि त्या पोलिस कॉन्स्टेबलचे निलंबन न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ही त्यांनी दिला आहे. या निवेदनावर राष्ट्रीय सचिव हनिफ पठाण, परशुराम साळवे, दगडू साळवे, संतोष भडकवाड, भाऊसाहेब आव्हाड, नंदू आरणे, सोपान पगारे, शिवसेनेचे मंजाबापू साळवे, शिर्डी शहाराध्यक्ष समीर वीर, रामभाऊ पिंगळे, ज्ञानेश्वर हातागळे आदींची नावे आहेत 

शिर्डी सारख्या पवित्र ठिकाणी पहाटे साडे चार ते पाचच्या दरम्यान दोन खून झाल्याची माहिती शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते, ताराचंद कोते, सुरेश आरने, सचिन चौगुले, समीर वीर, संजय आरने, शिवा उमाप यांनी मोबाईल द्वारे सुजय विखेना सदर घटनेची माहिती दिली. माहिती कळताच डॉ. सुजय विखे त्याक्षणी शिर्डीत दाखल होऊन जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला यांना माहिती देऊन सदर घटनेतील आरोपी त्वरित अटक झाले पाहिजे असे आदेश दिले. त्यांच्या या आदेशाने शिर्डीतील पोलीस दल जागरूक होऊन पाच तासातच एक आरोपी तर बारा तासांनी दुसरा आरोपी पकडून सदर गुन्ह्याचा छडा लावला. माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी तत्परपणे घेतलेल्या ॲक्शन वर शिर्डीकर नागरिकांनी आभार मानले आहे.