शेवगाव तालुक्यातील लोळेगाव बनले क्षयरोग मुक्त

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३ : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण अभियानाअंतर्गत देण्यात येणारा ( सन २०२३ ) पुरस्कार शेवगाव तालुक्यातील लोळेगाव ग्रामपंचायतला प्राप्त झाला आहे. क्षयरोगमुक्त गाव केल्याबद्दल जिल्ह्यातील गावांच्या पदाधिकाऱ्याचा  गुण गौरव सोहळा नुकताच अहमदनगर येथे संपन्न झाला. यावेळी  लोळेगाव ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

शेवगाव तालुक्यातील लोळेगाव या गावाची ग्रामपंचायत क्षयरोग मुक्त ठरली आहे. त्याबद्दल क्षयमुक्त ग्रामपंचायत हा पुरस्कार जिल्हा अधिकारी सिद्धराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे यांच्या शुभहस्ते   ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जवाहरलाल नेहरू सभागृहात झालेल्या शानदार सोहळ्यात सरपंच सुनिता काळे, माजी सरपंच भानुदास काळे, ग्रामपंचायत सदस्य सुधिर काळे, काकासाहेब केदार, माजी सरपंच सोमनाथ शिनगारे,निशा शिनगारे, डॉ. संकल्प लोनकर, डॉ विजय लांडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 

Leave a Reply