शेवगाव प्रतिनिधी, दि. ३ : शेअर मार्केटच्या नावाखाली अधिक परतवा देण्याचे अभिष दाखवून तब्बल २ कोटी ५६ लाख रुपयांचा गंडा घालणा-या येथील आरोपीना पोलीसांनी पुणे येथुन जेरबंद केले आहे.
या संदर्भात प्रविण विक्रम बुधवंत वय- ४१ वर्षे, धंदा- खासगी नोकरी रा. एअरटेल टॉवरजवळ, मिरीरोड शेवगाव यांचे फिर्यादीवरुन भगवानबाबा व्हीके ट्रेड्रीग सोलुशन कंपनी लाडजळगाव येथील ऋषिकेश ज्ञानदेव कोकाटे व अमोल मोहन तहकीक दोन्ही राहणारी लाड जळगाव ता. शेवगाव यांचे विरुद्ध एकूण २ कोटी ५६ लाख रुपयांची फसवणूक केली. दिलेल्या फिर्यादीवरुन शेवगांव पोलीस भादवि कलम -४२०,४०९,४०६,३४ प्रमाणे दि. २० जुलै २०२४ ला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना दोन्ही आरोपी पुणे येथे असल्याची बातमी मिळाल्याने त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून पोलीस पथक तयार करुन पुणे येथे आरोपीना ताब्यात घेण्यासाठी पाठविले होते. तपास पथकाने पुणे येथे जावुन मांजरी हडपसर, पुणे येथुन दोन्ही आरोपी पळुन जात असताना रविवारी पहाटे ५ वाचे सुमारास पाठलाग करुन ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे. या आरोपी विरुध्द अशा प्रकारची फसवणुक झाली असल्यास त्यांनी शेवगाव पोस्टेशनला संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
ही कारवाई ही अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे अहमदनगर, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी सुनिल पाटील उपविभाग शेवगांव यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. समाधान नागरे, पोसई भास्कर गावंडे, पोहेकों किशोर काळे, पोकों शाम गुंजाळ, पोकॉ संतोष वाघ, पोकाँ राहुल खेडकर, पोकों बप्पासाहेब धाकतोडे, पोकों संदिप म्हस्के पोकों राहुल आठरे तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पोकॉ राहुल गुड्डू यांनी केली असुन वरिल गुन्ह्यांचा तपास पोसई भास्कर गांवडे हे करत आहेत.