संजीवनी एमबीएमध्ये आर्थिक व्यवस्थापन केंद्राचे उद्घाटन

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १७ : या महाकाय विश्वात कोणी नोकरदार असतो, कोणी उद्योजग असतो, तर कोणी आपला छोटा मोठा व्यवसाय करून कुटूंबाचा उदर निर्वाह करतो, परंतु हे सर्व करत असताना मिळणाऱ्या  आमदानीचे एखाद्या  व्यक्तीकडून आर्थिक नियोजनच होत नसेल, तर त्या व्यक्तिला आर्थिक गरज असताना मोठ्या  संकटांना आणि पश्चातापाला  सामोरे जावे लागते, ही वस्तुथिती आहे.

म्हणुन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स  संचलित विविध संस्थांमधिल विध्यार्थ्यांना  आर्थिक नियोजनाचे धडे ते शिक्षण  घेत असतानाच मिळावे, या हेतुने  संजीवनी एमबीए विभागात संजीवनी ग्रुप  ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांचे संकल्पनेतुन ‘सेंटर ऑफ  एक्सलन्स इन फायनांसियल मॅनेजमेंट’ ची स्थापना करण्यात आली.

या सेंटरचे उद्घाटन नुकतेच संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे यांचे प्रमुख उपस्थितीत संचय कॅपिटल-मोतीलाल ओसवाल कंपनीचे डायरेक्टर श्री सचिन कोते यांचे हस्ते झाले. यापुर्वीच गुंतवणूक  क्षेत्रात सेवा पुरविणाऱ्या  संचय कॅपिटल-मोतीलाल ओसवाल या संस्थेशी  संजीवनी एमबीए विभागाने समजोता करार केला आहे. सदर प्रसंगी कंपनीचे मार्केटींग हेड  श्री अजिंक्य जाधव, संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजचे डायरेक्टर डाॅ. ए. जी. ठाकुर, विभाग प्रमुख डाॅ. विनोद मालकर,  सेंटरच्या समन्वयिका प्रा. पुजा कावळे, आदी उपस्थित होते.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स  संचलित इंजिनिअरींग, एमबीए, फार्मसी, पाॅलीटेक्निक, सिनिअर काॅलेज या संस्थांनी आपल्या विध्यार्थ्यांना मोठ्या  प्रमाणात नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या  मिळवुन दिल्या आहेत. या संस्थांना ४० वर्षांची  मोठी परंपरा असुन अनेक माजी विध्यार्थी देश  परदेशात मोठ्या  पदांवर कार्यरत आहेत तर काही उद्योजक बनले आहे. सर्व माजी विध्यार्थी मोठ्या  प्रमाणावर अर्थार्जन करून योग्य आर्थिक नियोजन करून यशस्वी जीवन जगत आहेत. खरं तर कोविड १९ च्या महामारीत अनेकांचे आर्थिक गणित कोलमडले.

 एकाद्या वर्षी  आर्थिक संकट आले तर त्यातुन मार्ग काढणे कुटूब प्रमुखाला जिकरीचे होवुन बसते. असा प्रसंग भविष्यात  येवुच नये यासाठी पैसा कोठे गुंतवावा, मिळालेल्या आर्थिक प्राप्तीचे नियोजन कसे करावे, यासाठी आता संजीवनी एमबीए मध्येच विध्यार्थ्यांना  तज्ञांच्या मार्फत नियोजनाचे धडे मिळणार आहे.