संजीवनीच्या ४४ विद्यार्थ्यांची ब्रेम्बो ब्रेक्समध्ये निवड – अमित कोल्हे

कोपरगांव प्रतिनिधी, दि, १८ : संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने ब्रेम्बो ब्रेक्स या बहुराष्ट्रीय  कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत घेतलेल्या परीसर मुलाखतींमध्ये तब्बल ४४ विद्यार्थ्यांची  नोकरीसाठी निवड केली असुन ब्रेम्बो ब्रेक्स कंपनीने ही जम्बो निवड करून संजीवनी पाॅलीटेक्निकचे विध्यार्थी तीन वर्षात  ‘जाॅब रेडी’ होतात, या रूढलेल्या परंपरेला पुष्टी  दिली, अशी  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

  कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की, ब्रेम्बो ब्रेक्स ही मुळची इटालियन कंपनी असुन जगात तीन खंडात १५ देशात  कार्यरत आहे. उच्च कार्यक्षमता कार आणि मोटर सायकलच्या ब्रेकिग सिस्टिमच्या डिझाइन, विकास आणि उत्पादनात ही आघाडीची कंपनी आहे. या कंपनीने नोकरीसाठी निवड केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये  केतकी राजेंद्र गरूड, प्रिती विलास कोते, पुजा रघुनाथ सरोदे, अक्षदा बाळासाहेब सांगळे, नम्रता विश्वास  कोळगे, ऋतुजा नंदकुमार गोळे, मयुरी नानासाहेब गाढवे, शिवकन्या शेषराव  कांबळे, प्रथमेश  अनिल कोळगे, नचिकेत युवराज येशी , स्वयंम महेश  जंगम, प्रतिक ज्ञानेश्वर  पगारे, हिमांशू  राजेंद्र शिंदे , धिरज  साळभाऊ नरवडे, कुनाल जयराम पवार, ओम संजय काळे, कृष्णा  दिपक शेळके,

नितिन दिलीप सालपुरे, प्रतिक मंगेश  नाईकवाडे, सुमित वाल्मिक भड, अनुज गंगाधर हरदे, राधेय योगेश शिंदे , फायझान फरीद शेख, रेवननाथ दगडू धनवटे, साहिल नामदेव जाधव, हर्षद  अनिल पवार, तेजस दादासाहेब शेळके, मोहम्मद साजिद रझा, आशुतोष कुमार तिवारी, रंजन कुमार, आकाश कुमार पांडेय, प्रेम कुमार, दिपाली रतन म्हस्के, नसरूल्लाह अन्सारी, गौरव शिवाजी  जाधव, ऋषिकेश  अच्युत फोपसे, अनुप कुमार पांडेय, स्नेहल संजय शिंदे , जितेंद्र कुमार यादव, गौरव हारिभाऊ भोगे, ऋतुजा मनोज गुंजाळ व ओम भिकन डांगे यांचा समावेश आहे.

           या सर्व विध्यार्थ्यांना  वयाच्या १९ व्या वर्षी  संजीवनीच्या प्रयत्नातुन नोकरी मिळाल्याबध्दल अनेक पालकांनी धन्यवाद व्यक्त केले. अमित कोल्हे यांनी या सर्व विद्यार्थ्यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राचार्य ए. आर. मिरीकर, ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट ऑफिसर  प्रा. आय. के. सय्यद, प्रा. गिरीश  वट्टमवार, प्रा. अमोल ढाकणे, प्रा. गणेश  गव्हाणे व प्रा. राहुल भाकरे उपस्थित होते. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष नितीनदादा कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनीही सर्व निवड झालेले विध्यार्थी व त्यांच्या भाग्यवान पालकांचे अभिनंदन केले आहे.