महिलांनी दडपण न ठेवता पुढे यावे – राऊळ

Mypage

शिक्षक बँकेतील महिला मेळाव्यास केले संबोधीत

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि. १७ : महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. त्यांच्यात पुरेपुर क्षमता आहे. तेव्हा कोणतेही दडपण न ठेवता त्यांनी  निर्भीड होवून विविध क्षेत्रात हिरीरीने पुढे यायला हवे. असे आवाहन शिक्षण विस्तार अधिकारी शैलजा राऊळ यांनी केले.

Mypage

       गुरुमाऊली मंडळ २०१५, ऐक्य मंडळ, एकल शिक्षक मंच, शिक्षक भारती व परिवर्तन मंडळाच्या वतीने शेवगाव येथील शिक्षक बँकेच्या  फलके गुरुजी सभागृहांत  महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.  यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.

Mypage

       यावेळी प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक रमेश गोरे यांनी शिक्षक बँकेतल्या विविध योजनांची माहिती देवून शिक्षक नेते  बापूसाहेब तांबे, गुरुमाली मंडळाचे अध्यक्ष राजकुमार साळवे, ऐक्य मंडळाचे बाबासाहेब कदम शिक्षक भारतीचे दिनेश खोसे, परिवर्तन मंडळाचे राजेंद्र विधाते व एकल मंचचे एस.पी. नरसाळे यांच्या  मार्गदर्शनाखाली बॅंकेचे कामकाज उत्तम प्रकारे चालू  असल्याचे सांगितले.

Mypage

      यावेळी राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका  श्रीकांता शिंदे, जिल्हा पुरस्कार शिक्षिका कृष्णाताई उंदरे, रोहिणी साबळे, शुभांगी शेलार, सविता बुधवंत, केंद्रप्रमुख मिराताई केदार,  उषा पाचेगांवकर, मिरा नितनाथ, विनोबा भावे ऍपमध्ये बेस्ट टीचर अवार्ड प्राप्त  मनीषा वडते व रिता गांगरडे ,संविधान विषयात पुरस्कार प्राप्त शिक्षिका रत्ना बैरागी यांचाही सन्मान करण्यात आला.

Mypage

      कार्यक्रमास शेवगाव तालुका महिला आघाडी अध्यक्षा सुभद्राताई वांढेकर, शकुंतला अकोलकर, गजालाबानू सय्यद, मल्लेका इनामदार, समिराकोम काझी, अर्चना महानोर, विद्या गुंजाळ, वंदना चौधरी, सुनंदा सातपुते, संजिवनी झिरपे, योगीता भापकर, मनिषा मिसाळ, अनुराधा मुरकुटे, जयश्री कांबळे, आशा ढोले, माया बागडे, सुलभाताई फलके, संगिता शेरकर, चित्रा  शेजुळ, वैशाली शेळके, शिल्पा वेद‌पाठक,     

Mypage

नवनाथ फाटके, विनोद फलके, नानाभाऊ शिंदे, सखाराम सातपुते, निवृत्ती गोरे, सुभाष घुले, विलास लवांडे,  संदीप कातकडे,  प्रविण मगर,  बशीर शेख, वसीम पठाण, गोरक्षणाथ बर्डे,  अरुण बांगर, मनोहर बैरागी उपस्थित होते.
     कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  सुनिल खैरे यांनी केले .बलभीम मुखेकर यांनी आभार मानले.

Mypage