शेवगावच्या नदंन आधाटला राष्ट्रीय कुस्तीत सुवर्ण पदक

शेवगाव प्रतिनिधी, दि. २७ : स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने दि. २० व २१ जून दरम्यान जम्मू काश्मिरला पार पडलेल्या १४ युवारत्न ओपन राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ३५ किलो वजनी गटात शेवगाव येथील नदंन सोमनाथ आधाट याने फायनल कुस्ती जिंकून सुवर्ण पदक पटकावले आहे.

      या  राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, तेलंगाना, मध्यप्रदेश यासह विविध राज्यातील मल्लाचा सहभाग होता. महाराष्ट्राचे नेतृत्व विश्वात्मक जंगली महाराज ट्रस्ट संचालित आत्मा मलिक कुस्ती केंद्रातील २५ मल्लांनी या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.

       यात महाराष्ट्र संघांने विविध पदके पटकावत बाजी मारली. नदंन सोमनाथ आधाट हा सुवर्ण पदकांचा मानकरी ठरला. नंदन आत्मा मलिक कुस्ती केंद्रात पै.भरत नायकल यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे गिरवत आहे. त्याच्या या यशाबद्दल आत्मा मलिक केंद्राचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार निलेश लंके यांच्या सह विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी पै.विवेक नायकल, पै.राजु पाटील यांनी त्याचे प्रशिक्षक म्हणून काम पाहीले आहे.