राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सेवादल जिल्हाध्यक्षपदी विनोद साळवे

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि. ०७ : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पार्टीच्या सेवादल जिल्हाध्यक्षपदी विनोद साळवे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. पार्टीच्या मुंबई येथे झालेल्या कार्यकर्ता बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी उपमुख्यमत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष  अजित पवार यांचे हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र  देण्यात आले.

Mypage

यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सेवादल विभाग राज्य प्रमुख राजेंद्र लावंधरे आदिंसह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. साळवे यांच्या निवडीबद्दल माजी आमदार चंद्रशेखर घुले, प्रदेश सरचिटणीस तथा कोषाध्यक्ष शिवाजी गर्जे, आमदार संग्राम जगताप, आमदार निलेश लंके, जिल्हाध्यक्ष (उत्तर )कपील पवार, शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, शहानवाज खान, बाबा शेख, शेखर बोत्रे, चंद्रकांत वाघमारे आदिंसह पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे. 

Mypage