मा.आ.कोल्हे यांच्यामुळे हद्दवाढ भागाचे सुवर्णक्षण प्रत्यक्षात होणार साकार – दिपा गिरमे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०८ : द्वारकानगरी व शंकरनगर भागाला जोडणाऱ्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सदर पुल होण्यासाठी मा.आ. स्नेहलता कोल्हे यांनी दूरदृष्टी ठेऊन प्रशासनाला निदर्शनास आणून दिलेली वस्तुस्थिती जमेची बाजू ठरली आहे. सातत्याने अतिवृष्टी झाल्यावर हद्दवाढ भागाची दळणवळणाची अडचण होत असल्याचे कोल्हे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ पालकमंत्री व प्रशासन यांना अवगत करून हद्दवाढ भागासाठी हक्काचा निधी तातडीने मिळण्याची मागणी केली होती.

त्यातून नूतन पुलाची निर्मिती होत असल्याने या भागात समाधानाचे वातावरण आहे. गोकुळनगरी पुलाचा प्रश्न मार्गी लावला त्या प्रमाणे कोल्हे यांनी हद्दवाढ भागाचा पुलाचा प्रश्न मार्गी लावला आहे अशी प्रतिक्रिया दिपा वैभव गिरमे यांनी दिली आहे. गत अतिवृष्टीत याच भागातील पुल वाहून गेल्याने हद्दवाढ भागाचा संपर्क कोपरगाव शहरापासून तुटला होता.

हे लक्षात येताच भाजपा कार्यकर्ते प्रसाद आढाव व या भागातील भाजपा पदाधिकारी यांनी कोल्हे यांच्या सूचनेवरून स्व खर्चाने त्या पुलाच्या वाहून गेलेल्या भराव्याचे डागडुजी काम करून काही तासातच पुल दळणवळणासाठी पूर्ववत केला होता. खडतर प्रसंगातही कोल्हे यांचे या भागाकडे असणारे विशेष लक्ष यामुळे प्रशासन आणि शासन नागरीकांना सुविधा देण्यासाठी बांधील आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी झालेला निर्णय हा महत्वाचा ठरला.

दीड वर्षापूर्वी देवकर प्लॉट भागात अंत्यसंस्कारावेळी एक अंत्ययात्रा घेऊन जाण्यासाठी रस्ता नसल्याने प्रचंड चिखलातून डोक्यावर पार्थिव घेऊन जाण्याची दुर्दैवी वेळ आली होती. या घटनेने दुःखी झाल्याने स्थानिक भाजपा पदाधिकारी यांनी सदरचा रस्ता स्व खर्चाने करून घेतल्याची घटना देखील विस्मरण होणे अशक्य आहे.

शंकरनगर, आढाव वस्ती, पवार वस्ती, रानोडे वस्ती, साबळे वस्ती, कुंढारे वस्ती, शंकरनगर मागील मुस्लिम बांधव वसाहत या सह परिसराचा मोठा कायापालट होण्यासाठी विविध कामे कोल्हे यांनी सुचवली असून त्यासाठी हद्दवाढ भागाचा हक्काचा मिळणारा निधी हा महत्वपूर्ण ठरणार आहे.

अनेक वर्ष विविध सुविधांपासून वंचित असणारा त्रिशंकू भाग स्नेहलता कोल्हे यांनी विकासाच्या दृष्टीने शहराला जोडला. हद्दवाढ झाल्यानंतर कुठल्याही भूभागास शहर हद्दीत समावेश झाल्यानंतर त्या भागाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्याची जबाबदारी प्रशासनाची असते. त्या प्रमाणे कोल्हे यांनी ऐतिहासिक निर्णय घेत सदर भागाचे सुवर्णक्षण कधीच विसरता येणार नाहीत.