आत्मा मालिक पॅटर्न पुन्हा अव्वल

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१६ : राष्ट्रीय आर्थिक दुबर्ल घटक शिष्यवृत्ती (एन.एम.एम.एस.) परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला. यामध्ये आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलाचे 160 विदयार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहे.

राज्यात एका शाळेत सर्वाधिक विदयार्थी गुणवत्ता यादीत येण्याचा मान नवव्यांदा आत्मा मालिकने मिळविला. या विदयार्थ्यांना दरमहा एक हजार रुपयाप्रमाणे चार वर्षासाठी 48000 रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. 160  विदयार्थ्यांनी 76 लाख 80 हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.

आत्मा मालिकचे आज पर्यंत 1453 विदयार्थी गुणवत्ता यादीत आलेले असून त्यांनी 6 कोटी 97 लाख 44 हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. तर छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी 229 विदयार्थी पात्र झाले असून त्यांना प्रत्येकी 38400 रुपयांप्रमाणे 87 लाख 93 हजार  600 रुपयांची शिष्यवृत्ती प्राप्त होणार असल्याची माहिती गुरुकुलाचे प्राचार्य निरंजन डांगे यांनी दिली.

एन.एम.एम.एस. शिष्यवृत्तीमध्ये सर्वाधिक विदयार्थी गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या शाळांमध्ये 160 विदयार्थ्यांसह आत्मा मालिक प्रथम असून कोल्हापूरचे पी. बी. पाटील विद्यालय 75 विदयार्थ्यांसह द्वितीय स्थानी तर न्यू इंग्लिष स्कूल, बारगांव पिंप्री सिन्नर ही शाळा 65 विदयार्थ्यांसह तृतीय स्थानी आहे.

या विदयार्थ्यांनां प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख रविंद्र देठे, सचिन डांगे, सागर अहिरे, अनिल सोनवणे, रमेष कालेकर, मिना नरवडे, बाळकृष्ण दौंड पर्यंवेक्षक सुनिल पाटील, नितीन अनाप, नयना शेटे, विषय शिक्षक राहुल जाधव, गणेष वाघ, सोपान शेळके, अनिता वाणी, किशोर बडाख, संदिप शिंदे, पाडूरंग वायखिंडे, ज्ञानेश्वर म्हस्के, अजय कांबळे, वैशाली तांबे, वर्षा सोमासे, पुनम खांडेकर, सोमनाथ व्यवहारे, संघर्शा बनसोडे, 

संग्राम जौंजाळ, दत्तात्रय गायकवाड, गणेष कांबळे, सचिन जगधने, षिवम तिवारी, अंषुमन गुप्ता, पंकज गुरसळ, राजेंद्र जाधव, वनिता लोंढे, मीना सातव, आषा देठे, अश्विनी जावळे, सर्जेंराव भुजाडे, पुनम पावसे, अंजली तिवारी, साईकुमार कावळे, पुनम राऊत, बबन जपे, बाळासाहेब कराळे, संजय कहांडळ, राजश्री पिंगळ, सुनंदा कराळे यांचे मार्गदर्षन लाभले.

यशस्वी विदयार्थ्यांचे परमपुज्य आत्मा मालिक माऊलींच्या कृपाशिर्वादासह संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यंवशी, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, विश्वस्त प्रकाश भट, बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गिरमे, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे आदिंनी अभिनंदन केले.