आयुर्वेदिक डॉक्टरांच्या मोटारसायकल रॅलीने वेधले लक्ष 

कोपरगाव प्रतिनिधी, दि १७ : निमा’ उर्फ नॅशनल इंटिलेटेड मेडिकल असोसिएशन या राष्ट्रीय संघटनेचे कार्यकर्ते असणाऱ्या बी. ए. एम्. एस् डॉक्टरांनी कोपरगाव शहरातील प्रमुख रस्त्यांवरून एक भव्य मोटारसायकल रॅली काढली. निमा या आयुर्वेद डॉक्टरांच्या संघटनेला आज ७५ वर्षे पूर्ण झाल्याने संपूर्ण देशभरात याच प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले.

कोपरगाव तालुका निमा अध्यक्ष डॉ. जितेंद्र रणदिवे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे एकूण १०० मेंबर्स त्यांनी रक्तदान शिबीरे आरोग्य तपासणी शिबीरे, जनजागृती असून वर्षभर कार्यक्रम राबविले. गुरुवारी सकाळी शहरातील  छत्रपती संभाजी महाराज सर्कल येथे तालुक्यातील सुमारे ७५ आयुर्वेदाचार्य डॉक्टरांनी या मोटारसायकल रॅलीमध्ये सहभाग घेतला त्यात ३० महिला डॉक्टर्स होत्या.

माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष  युवराज गांगवे, भाऊसाहेब निंबाळकर, कोपरे यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवताच सर्व डॉक्टरांनी अतिशय शिस्तबद्धपणे आपापली वाहने एका  रांगेत चालवली.  नागरिकांनी उत्सुकतेने रॅलीचे बोर्ड आणि बॅनर्स वाचत  डॉक्टरांच्या रॅलीला  मोबाईलमध्ये साठवले. शहरातील मुख्य रस्त्यावरुन रॅली पुन्हा छत्रपती संभाजीमहाराज  सर्कल येथे येताच कोपरगावचे पोलिस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे व माजी सैनिकांनी डाॅक्टरांच्या रॅलीचे स्वागत केले आणि डॉक्टरांच्या एकीचे कौतुक केले.

कोपरगाव तालुका आयुर्वेदिक डॉक्टर संघटना अर्थात निमाचे  माजी अध्यक्ष डॉ. नितीन झंवर यांच्या कार्यकाळात  कोपरगाव तालुका शाखेने विविध उपक्रम राबवल्या बद्दल महाराष्ट्र निमा शाखेतर्फे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक तसेच  रक्तदान शिबीरासाठी राष्ट्रीय निमा शाखेचे प्रथम क्रमांकाचे बुक मिळाले, डॉ. नितीन झंवर व  डॉ. विलास आचारी यांनी संघटनेच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल गोंदिया येथील   राज्यस्तरीय निमा, कार्यक्रमात त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.

आयुर्वेदिक डॉक्टरांनी आरोग्य सेवे बरोबर संघटनेच्या कामात  राज्यात उत्कृष्ट कामगिरी करीत असल्याचे समाधान व्यक्त करीत कोपरगावच्या डॉक्टरांचे  कौतुक  आयुर्वेदाचार्य राष्ट्रीय गुरु डॉ. रामदास आव्हाड  यांनीही केले. डाॅ. रामदास आव्हाड यांनीही या रॅलीत सहभागी घेतला होता. या रॅलीत अध्यक्ष डॉ. जितेंद्र रणदिवे, डॉ. तुषार गलांडे, डॉ. विलास आचार्य, डॉ.अभिजित आचार्य, डॉ.राजेंद्र वाघडकर, यांच्यासह अनेक डाॅक्टरांचा सहभाग होता. डॉ कौस्तुभ भोईर यांनी सूत्रसंचालन केले. तरडॉ डॉ. मनोज बञा यांनी सर्वांचे आभार मानले.