शेवगाव आगारास २.९५ कोटी रुपयाचे विक्रमी उत्पन्न

शेवगाव प्रतिनिधी, दि. ११ : राज्य परिवहन महामंडळाच्या शेवगाव आगारास नुकत्याच संपलेल्या जून महिन्यात दोन कोटी ९५ लाख ४८ हजार रुपयाचे विक्रमी उत्पन्न मिळाले. आगारातील चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या सामूहिक प्रयत्नातून देखभाल दुरुस्ती  खर्चामध्ये (मेंटेनन्स चार्जेस ) बचत केल्याने शेवगाव आगारास तीन लाख सहा हजार रुपयाचा नफा मिळाला असून जिल्ह्यात शेवगाव आगाराचा दुसरा क्रमांक आल्याची माहिती आगार व्यवस्थापक राजेंद्र फंड यांनी दिली.

     शेवगाव आगाराने माहे जून २०२३ मध्ये २९५.४८ लाख उत्पन्न आणले. ५.२२ लाख किलो मीटर माध्यमातून प्रति किलो मीटर ५६.६० उप्तन्न आले  असून भारमान ८६.९६ टक्के इतके झाले आहे. आगारातील सर्वांच्या बहुमोल योगदानाचे हे फलित असल्याची प्रतिक्रीया आगार व्यवस्थापक फंड यांनी व्यक्त केली.

      तसेच दिनांक १९ जून ते ३ जुलै या कालावधीत आषाढी सोहळ्याच्या दरम्यान शेवगाव आगाराने ५ ६ एस टी बसेसच्या माध्यमातून शेवगाव ते पंढरपूर अशा १३४ फेर्‍या मारल्या. हा ३२ हजार ३९३ किलोमीटरचा प्रवास झाला. त्यातून शेवगाव आगारात १७ लाख ६ ६ हजार ९२५ रुपये उप्तन्न मिळाले. या काळात ७ हजार ७१९ अमृत ७५ वर्षावरील नागरिक, २ हजार ३६३ महिला व एक हजार ९ ज्येष्ठ नागरिकानी विविध सवलतीचा लाभ घेतला. शेवगाव आगाराच्या या कामगिरीचे विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.