कोपरगांव प्रतिनिधी, दि. २८ : संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित इंजिनिअरींग काॅलेज, एमबीए, फार्मसी, पाॅलीटेक्निक, सिनिअर काॅलेज मधिल विध्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रूंदविण्यासाठी व जागतिक आव्हाने पेलण्याच्या क्षमता विकसित करण्यासाठी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाच्या पुढाकाराने अलिकडच्या काळात जर्मनीच्या आरडब्ल्युटीएच आचेन युनिव्हर्सिटी, कंबोडियाच्या इन्स्टिट्युट ऑफ टेक्नाॅलाॅजी व फिलीपाईन्सच्या टारलॅक अग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीशी परस्पर सामंजस्य करार करून शैक्षणिक जगतात एक क्रांतिकारी पावुल टाकले आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात कोल्हे यांनी म्हटले आहे की, आरडब्ल्युटीएच आचेन युनिव्हर्सिटीचा जागतिक क्रमवारीत क्युएस रॅन्कींग १४७ वा आहे. इन्स्टिट्युट ऑफ टेक्नाॅलाॅजी या विद्यापीठाचा कंबोडिया देशात दर्जा व गुणवत्तेच्या आधारावर दुसरा क्रमांक आहे. फिलीपाईन्सच्या टारलॅक अग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीशीला थ्री स्टार क्युएस रेटींग आहे. अशा नामवंत विद्यापीठांशी संजीवनीने करार करून जागतिक पातळीवर पोहचण्याचा प्रयत्न केला आहे.
संजीवनीचे विध्यार्थी हे जागतिक पातळीवरील स्पर्धांना सक्षम बनावे, आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात ते आघाडीवर असावे म्हणुन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने यापुर्वीही युनिव्हर्सिटी ऑफ लेथब्रीज, कॅनडा, पोझनन युनिव्हर्सिटी , पोलंड, एन डब्ल्यु युनिव्हर्सिटी , सावुथ आफ्रिका व शेनकर काॅलेज ऑफ इजिनिअरींग, इस्त्राईल यांचेशी सामंजस्य करार केलेले आहेत. तसेच रसियातील युरल फेडरल विद्यापीठाशी (युर्फू) परस्पर सामंजस्य करार केला आहे, त्या अंतर्गत विध्यार्थ्यांना प्रकल्प आधारीत ऑनलाईन प्रशिक्षणाची संधी नोव्हेंबर २०२० मध्ये मिळाली होती.