दुष्काळ जाहीर करा भाजपा कार्यकर्त्याची मागणी

शेवगाव प्रतिनिधी, दि. ०२ : तालुक्यात पर्जन्यामान सरासरीपेक्षा खुपच कमी असल्याने तालुक्यात सरसकट दुष्काळ जाहीर करुन सर्व सामान्यांना दिलासा द्यावा. अशी मागणी शेवगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. शेवगावची सुधारित आनेवारी ५० पैशापेक्षा कमी असुन येथील शेवगाव, भातकुडगाव, दहिगावने, ढोरजळगावशे, एरंडगाव, मुंगी, बोधेगाव या सर्वच महसुल मंडळामध्ये आपुरा पाऊस आहे. त्यामुळे खरीपाची पिके वाया गेली असुन रब्बीची पिके देखील होऊ शकणार नाहीत. अशी वस्तुस्थिती आहे.

या अस्मानी संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडला असुन शेतीवर अवलंबुन असणाऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. तालुक्यात टंचाई सदृष्य परिस्थिती असुन सध्याची परिस्थिती पहाता तालुक्यात लवकरच पिण्याच्या पाण्याची व जनावरांची चारा टंचाई निर्माण होऊ शकते, शासकिय मदत मिळणेसाठी व शेतकरी, शेतमजुर यांना धीर देणेकरिता तालुक्यात तात्काळ सरसकार दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना पीक विमा व शासकिय मदत मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

परिविक्षाधिन तहसिलदार राहुल गुरव यांनी निवेदन स्विकारले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, माजी नगरसेवक महेश फलके, गणेश कोरडे, गंगा खेडकर, केशव आंधळे, राणेगांवचे सरपंच शहादेव खेडकर, ठा. निमगावचे सरपंच संभाजी कातकडे, राक्षीचे सरपंच भक्तराज कातकडे, शिवाजी भिसे, भाजपा तालुका महिला आघाडी अध्यक्षा आशा गरड, शहराध्यक्षा उषा कंगणकर, संदीप जावळे, प्रा. नितीन मालानी, भगवान तेलोरे, कैलास सोनवणे, ज्ञानेश्वर खांबट, सुरेश थोरात, एकनाथ खोसे, हरिभाऊ झुंबड, अमोल माने, विठ्ठल बिडे, बाबासाहेब धस, आप्पासाहेब पोटभरे, नवनाथ फासाटे आदीं उपस्थित होते.