कोरपगाव प्रतिनिधी, दि.०९ : तंत्रज्ञान आणि धावपळीच्या युगात जीवनमनात आणि नागरिकांच्या राहणीमानात बदल झाल्यामुळे आहारात देखिल बदल झाला. म्हणूनच आहार बिघडल्यामुळेच आरोग्य बिघडले आहे, असे मत डॉ. कुंदन गायकवाड यांनी व्यक्त केले.
दि.०८ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमा अंतर्गत श्री साईनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिर्डी येथे बदलत्या जीवनशैलीमुळे लहान वयात होणारे आजार व प्रतिबंधात्मक उपाय तसेच जंतनाशक मोहीम याबद्दल डॉ. कुंदन गायकवाड बोलत होते. यावेळी बेलदार शंकर पर्यवेक्षक, चौरे पंढरीनाथ, गोर्डे संतोष, कोबरणे सिद्धार्थ, शेळके रत्ना सर्व उप.शिक्षक उपस्थित होते.
डॉ. गायकवाड पुढे म्हणाले कि, फास्ट फूडमुळे आपणास विविध आजार, व्याधी जडत आहेत. लहान मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यामध्ये फास्ट फूड खाण्याचा कल वाढत आहे.
हीच वेळ आहे स्वतःत बदल करण्याची, शायेय जीवनापासूनच योग्य आहार घेतल्यास भविष्यात होणाऱ्या आजारापासून बचाव होऊ शकतो. असेही ते म्हणाले. यावेळ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.