लाखो रुपये खर्चून हायमॅक्स विजेचे खांब अद्याप बल्प वीना उभे

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि.११ : शेवगाव नगरपरिषदेने गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात शहरातील प्रमुख चौकांमध्ये तातडीने हाय मॅक्स दिवे बसवण्याचा निर्णय घेतला. मोठ्या आत्मियतेने व शिघ्र गतीने तांत्रिक प्रक्रिया पार पाडत ठेकेदार कंपनीला वर्क ऑर्डर देऊन लाखो रुपये खर्चाच्या हाय मॅक्स दिव्याचे भव्य खांब देखील ठिक ठिकाणच्या चौकात उभारले. मात्र, दीर्घ काळ लोटला तरी हे खांब विना बल्पचे तसेच बोडखे तिष्ठत उभे आहेत.

Mypage

या संदर्भात देखभाल दुरुस्तीसाठी व बल्प पुरवठा करण्या करिता नेमलेल्या { E.E.S.L.} ई.ई.एस.एल. कंपनीचे सुमारे एक कोटी रुपये बिल थकल्याचे आणि नगरपरिषदेकडे हाय मॅक्स साठी आवश्यक असणारे अधिक क्षमतेचे सुमारे दहा लाख रुपये किमतीचे बल्प खरेदीसाठी पैसे नसल्याचे समजते.

tml> Mypage

बल्प विना प्रमुख चौकात उभे असलेले बोडखे खांब येथे सर्वांच्या चर्चेचा व कुतूहलाचा विषय ठरले आहेत. शहरामध्ये अनेक भागांमध्ये व प्रमुख राज्य महामार्गांवर चौका चौकामध्ये हाय मॅक्सचे खांब बल्प विना तिष्ठत आहेत.

Mypage