ग्रामस्थाची वॉटर फिल्टर तात्काळ बसविण्याची मागणी

Mypage

शेवगाव प्रतिनिधी,दि.११ : तालुक्यातील कोळगाव ग्रामपंचायतीला अनेक दिवसा पासून वॉटर फिल्टर मंजुर आहे. मात्र, ग्रामपंचायत जागेचा वाद पूढे करून वॉटर फिल्टर बसवत नाही. त्यामुळे शुद्ध पाण्यापासुन गावकरी वंचित आहेत.

Mypage

यासंदर्भात स्थानिक छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने गटविकास  अधिकार्‍याकडे तक्रार करण्यात आली असून येथील वॉटर फिल्टर तात्काळ बसविण्यात यावे अन्यथा छावा संघटने मार्फत पंचायत समिती च्या  कार्यालयासमोर तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. असा इशारा एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

Mypage

यावेळी छावा क्रांतिवीर सेना तालुकाध्यक्ष दत्तात्रय वाघ, उप तालुकाध्यक्ष परमेश्वर पवार, लहू वाघ, महेश झिरपे, प्रदीप झिरपे, ज्ञानदेव कोरडे, माजी उपसरपंच आदिनाथ झिरपे, सोन्याबापू झिरपे, राहुल झिरपे, विष्णू वाघ, आदी उपस्थित होते. 

Mypage