कोपरगाव मध्ये भटक्या कुञ्यांनी तोडले ३ बालकांचे लचके

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ :  कोपरगाव शहरात भटक्या कुत्र्यांनी एकाच दिवशी तीन बालकांच्या तोंडाचे लचके तोडून गंभिर जखमी केल्याची घटना घडल्याने शहरात कुञ्यांच्या दहशतीने नागरीक हवालदिल झाले आहेत.  ग्रामीभागात बिबटे आणि शहरात भटक्या कुञ्यांनी दहशत पसरवल्याने नागरीकांचा जीव टांगणीला लागला आहे.

या घटनेची मिळालेली अधिक माहीती अशी की, बुधवारी सकाळी दहाच्या दरम्यान शहरातील संजयनगर येथील आयशा काॅलनी या भागातील दोन लहान मुलं घरासमोर खेळत असता  भटक्या कुञ्यांनी अचानक या दोघांवर जीवघेणा हल्ला करून त्यांच्या तोंडाचे व मानेचे लचके तोडले. स्थानिक नागरीकांच्या सतर्कतेमुळे दोन बालकांचा जीव थोड्यात बचावला पण कुञ्यांच्या हल्ल्यात हसनन इम्रान तांबोळी (६), हमजा अत्तार(३) रा. आयेशा कॉलनी हे गंभिर जखमी झाले. तसेच 

 फैजल मोहसीन शेख (४) रा. हनुमाननगर ह्या बालकांवर कुञ्याने हल्ला करून जखमी केले आहेत. फैजल शेख यांच्या तोडावर कुत्र्याने जबरदस्त हल्ला केल्याने मोठ्या व खोल जखमा झाल्याने त्याला नगर येथे हलविण्यात आले. दरम्यान ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांवर उपचार करण्यात आले. इतर दोघांना घरी सोडण्यात आले आहे.

 नागरीकांच्या सतर्कतेमुळे भटक्या कुत्र्यांच्या तावडीतुन बालकांची सुटका झाली अन्यथा या भटक्या कुत्र्यांनी बालकांच्या नरडीचा खोट घेतला असता अशी भयानक घटना कोपरगाव शहरात घडल्याने सर्वञ हळहळ व्यक्त केली जात आहे.  बालकांच्या गालेचे लचके तोडल्याची माहीती शहरात समजताच भाजपचे पराग संधान, आरपीआयचे जितेंद्र रणशुर, माजी उपनगराध्यक्ष आरीफ कुरेशी, माजी नगरसेवक मेहमूद सय्यद आदीसह अनेकांनी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना घेराव घालुन शहरातील मोकाट कुञ्यासह जनावरांचा त्वरीत बंदोबस्त करण्याची मागणी लावून धरीत आरोग्य विभागाचे आरोग्य निरीक्षक सुनिल आरण व मुख्याधिकारी गोसावी यांना चांगलेच धारेवर धरले. 

 या संदर्भात आरोग्य निरीक्षक सुनिल आरण म्हणाले की, शहरातील संजयनगर नगर, सुभाषनगर या भागातील काही नागरीक चिकट, मटन विक्रीचा व्यवसाय करतात. चिकट, मटन विक्री करताना उरलेले टाकाऊ मांसाचे तुकडे एकञ गोळा करुन पालीकेच्या घंटा गाडीत टाकण्या ऐवजी थेट  उघड्यावर गटारीत किंवा खंदक नाल्यात टाकत असतात. नागरी वस्तीच्या अगदी जवळच हे टाकत असल्याने भटक्या कुञ्यांचे मनसोक्त खाण्यासाठी मिळते त्यामुळेच या भागात सर्वांधिक मोकाट कुञ्यांचा वावर वाढत आहे.

पालीकेच्यावतीने सर्वांना विनंती आहे की, चिकन, मटन विक्रेत्यांनी टाकाऊ मटेरियल घंटागाडीत टाकावे आपल्यामुळे इतरांच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. लवकरच मोकाट कुञ्यांचा बंदोबस्त केला जात आहे असेही आरण यांनी सांगितले. 

दरम्यान आपल्याच परिसरात चिकन, मटनाचे टाकाऊ घाण टाकुन आपल्याच बांधवांच्या मुलांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांनी यापुढे दक्षता घेणे गरजेचे आहे.  कुञ्यांच्या झुंडीच्या झुंडी नागरी वस्तीत धुमाकूळ घालत असतात. शेकडो कुञ्यांच्या झुंडी या भागात फिरुन अनेकांवर हल्ले करतात याला पालीका प्रशासनही तितकेच जबाबदार असल्याची चर्चा शहरात सुरु झाली आहे. शहरात मोकाट कुञे, गाढव, गाई, डुकरं यांची वाढती संख्या नागरीकांच्या आरोग्याला धोकादायक झाली आहे.