कडबाकुट्टी, लेडीज सायकल व पिठ गिरणीच्या सोडत प्रकरणी गैरप्रकार

शेवगाव प्रतिनिधी, दि. ११ : समाजकल्याण विभागाअंतर्गत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात घेण्यात आलेल्या कडबाकुट्टी, लेडीज सायकल व पिठाची गिरणीच्या सोडत प्रकरणी झालेल्या गैरप्रकारा बाबत योग्य चौकशी होवून दोषीआधिकार्यावर कारदेशीर कारवाई होवून पुन्हा सोडत घेण्यात यावी अन्यथा मंगळवार दिनांक १९ रोजी पंचायत समितीच्या कार्यालया समोर वंचित बहूजन आघाडीच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल असा इशारा गट विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदना द्वारे देण्यात आला आहे.

       निवेदनात म्हटले आहे की, सन २०२३-२४ आर्थिक वर्षात जि. प. सेस २०% फंडातून घेण्यात आलेल्या ९ कडबाकुट्टी, ३६ लेडीज सायकल, ८ पिठगीरणी लाभार्थीना द्यायच्या होत्या. त्या करिता आपण एक पत्र काढुन ८-१२-२०२३ रोजी कडबाकुट्टी लकी ड्रॉ सकाळी ११ वाजता, दि. ९ रोजी लेडीज सायकलीचा सकाळी ११ ला तर पिठाची गिरणीचा लकी ड्रॉ दि. ९ रोजी दुपारी ३ वाजता करण्याचे पत्र सर्व ग्रामसेवकांना दिले होते. असे असतांना हे लकी ड्रॉ ७-१२-२०२३  रोजी का घेण्यात आले.

तसेच ज्या लाभार्थींनी अर्ज दिले त्यांना कोणत्याही प्रकारची माहीती दिली नाही. असे का करण्यात आले?  आपणाकडे कडबाकुट्टी करिता १०५, लेडीज सायकल करिता ७६, पिठाची गिरणी करिता ६४ असे एकुण २४५ व्यक्तिंनी अर्ज केले होते. त्या पैकी किती लाभार्थींना आपण लकी ड्रॉ करिता बोलावले? याबाबत माहीती द्यावी.

याबाबत अशी शंका आहे की, आपण आपल्या मर्जीतील व्यक्तिंना भ्रष्टाचार करुन लकी ड्रॉ केला आहे. म्हाणून सदरचा लकी ड्रॉ नियमबाह्य झालेला असुन तो आर्थिक देवाण घेवाण करुन करण्यात आला आहे. तरी मे. साहेबास नम्र विनंती आहे की, सदरचा लकी ड्रॉ सर्व अर्ज केलेल्या लाभार्थी समक्ष त्वरित घेण्यात यावा अन्यथा वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ते पदाधिकारी तसेच अन्याय पिडीत लाभार्थी आपल्या दालनासमोर राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वात मंगळवार दि १९- रोजी बोंबाबोब आंदोलन करतील.

होणाऱ्या परिणामास सर्वश्री प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. या  निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना देण्यात आल्या आहेत. यावेळी तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल शेख, शहराध्यक्ष पप्पू गर्जे, सचिन तिजोरे, बाबासाहेब जाधव, शेख जब्बार व इतर सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.