राहुल नार्वेकर यांच्या निकालावर शेवगाव शिवसेनेचा निषेध

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि.१२ : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाचा ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र दळवी यांच्या नेतृत्वा खाली शेवगाव तालुका शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. सर्वप्रथम महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास हार घालून त्यानंतर निषेध आंदोलन करण्यात आले.

Mypage

याप्रसंगी बोलताना अनेक वक्त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल देताना भारतीय घटनेचे संविधान व कायदा या गोष्टीचा विचार न करता तसेच सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेल्या गाईडलाईनचे कोणतेही पालन केलेले नाही. उलट सुप्रीम कोर्टाने मांडलेल्या निरीक्षणाविरुद्ध सदरचा निकाल देऊन लोकशाहीचा गळा घोटून लोकशाहीचा खून केला.

Mypage

ही बाब जनतेला अस्वस्थ करणारी आहे. म्हणून कालच्या निकालाने खऱ्या अर्थाने हुकूमशाहीचा विजय व लोकशाहीचा खून झाला असे म्हणावे लागेल. अशी टीका केली. या वेळी तालुकाध्यक्ष मगरे, माजी जि.प.सदस्य रामभाऊ साळवे, प्रा.अशोक शिंदे, नंदू पातकळ कानिफ कर्डिले, रामराव चेमटे, एकनाथ कुसळकर, भारत लोहकरे, देविदास चव्हाण, शहर प्रमुख सिद्धार्थ काटे, शितल पुरनाळे, अक्षय बोडके उदय गांगुर्डे, कुलकर्णी आप्पा, रमेश पाटील, विकास भागवत, दादा रसाळ व अनेक शिवसैनिक उपस्थित होते. 

Mypage