मनोज जरांगेच्या लढ्याच्या समर्थनार्थ मोटर सायकल रॅली

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि.१२ : तालुक्यातील मठाचीवाडी सह परिसरातील गावातील मराठा समाजातील तरुणांनी अंतरवाली सराटी येथे होणाऱ्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी उभारलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी १४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मराठ्यांच्या विराट महासभेला उपस्थित राहण्यासाठी मठाचीवाडी परिसरातील शहाली पिंपरी, रांजणी, दहिगावने, भाविनिमगाव, शहरटाकळी, ढोरसडे, आंत्रे, देवटाकळी, बक्तरपुर, भातकुडगाव फाटा, भायगाव, मजलेशहर या गावात मोटरसायकल रॅली काढून जनजागृती केली. यावेळी प्रत्येक गावात या रॅलीचे मोठ्या उत्साहात स्वागत झाले.

Mypage

मठाचीवाडीमध्ये छत्रपती शिवरायांना अभिवादन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. यावेळी सरपंच सतीश धोंडे व विठ्ठल जगदाळे यांनी स्वागत केले. तर शहालीपिप्री मध्ये राजेंद्र नवथर, नितीन नवथर, बाळासाहेब नवथर, रांजणी मध्ये तात्यासाहेब घुले, अरुण थोरात, राजेंद्र घुले, दहिगावनेत राजाभाऊ पाऊलबुध्दे, बशीरभाई पठाण, कडुबाळ माताडे भविनिमगावमध्ये छत्रपती शिव स्मारक समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले.

Mypage

देवटाकळी ग्रामपंचायतच्या उपसरपंच उज्वला मेरड यांनी औक्षण करून स्वागत केले. भातकुडगाव फाटा येथे कामधेनु पतसंस्था बक्तरपुर व व्यापारी मित्र परिवाराच्या वतीने बाळासाहेब काळे व भाऊराव फटांगरे यांनी तर भायगाव मध्ये विठ्ठल आढाव मित्र मंडळाने, मजले शहरला सरपंच अशोक लोढे ज्ञानदेव लोढे यांनी स्वागत केले. रॅलीमध्ये रामजी शिदोरे, आत्माराम घुणे, संतोष वाघ, विकास थोरात, गणेश करंजे, महेश जगदाळे, महेश करंजे, विष्णू जगदाळे, विनोद ठोंबळ, विठ्ठल प्रल्हाद आढाव, प्रदिप नवथर, नानासाहेब नवथर, राजेंद्र जगदाळे, सोपान नवथर, दत्ता नवथर, सौरभ नवथर, सार्थक कमानदार, आकाश नवथर, शरद थोटे, शहाराम आगळे यांच्यासह बहुसंख्य तरुणांनी सहभाग घेतला.

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *