श्रीक्षेत्र अमरापूर येथे ‘बोर न्हाने’ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

शेवगाव प्रतिनिधी, दि.१६ : श्रीक्षेत्र अमरापूर येथील श्री रेणुका देवस्थानात किंक्रांती निमित्त श्री रेणुका भक्तानुरागी मंगल भालेराव व जयंती भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात भगवान परशुरामाचा ‘बोर न्हाने’ सोहळा संपन्न झाला.

प्रारंभी सकाळी नित्य नेमा प्रमाणे सातला श्री रेणुका मातेला व परशुरामाला दुधाचा अभिषेक घालून नविन महा वस्त्रे परिधान करण्यात आली. सव्वा अकराला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून साडेअकराला महाआरती झाली. देवस्थानचे पुजारी तुषार देवा, रमेश भोंग व श्रीनिवास कुलकर्णी यांनी सर्व विधी यथा सांग पार पाडल्या.

भगवान परशुराम कायम आईसाहेब श्री रेणुकामातेच्या सानिध्यात असतात. वर्षातून फक्त तिनदा विजया दशमीला, अक्षय तृतियेला श्री परशुराम जयंतीला व तिसऱ्यांदा संक्रन्ती नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे किंक्रांतीला बाहेर काढले जाते. त्यानुसार मंगळवारी किंक्रांतीला भगवान परशुरामाला बोरे, पेरु, भुईमुग शेंगा व चॉकलेटने स्नान घालण्यात आले.

या विधीला ‘बोर न्हाने’ म्हणतात. नंतर ही फळे लहानमुलांना प्रसाद म्हणून वाटली गेली. विद्या भोंग, सुनंदा कुलकर्णी, कविता माने, रेखा वाघमारे, संजय कर्डिले, बाळासाहेब माने, भाऊराव वाघमारे आदि भाविक यावेळी उपस्थित होते.