शेवगावात क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी

शेवगाव प्रतिनिधी, दि, २८ : क्रांती सुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी शेवगाव शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. सर्व शैक्षणिक संस्था, नगरपरिषद, पंचायत समिती, शिक्षण विभाग, तसेच विविध संघटनाच्या वतीने आज फुले जयंती हिरीरीने साजरी करण्यात आली.

     येथील क्रांती चौकात शेवगाव नागरीकांच्या वतीने फुले जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कौन्सिल सदस्य कॉ.संजय नांगरे म्हणाले, सर्वसामान्य माणूस शिक्षित व्हावा, स्त्रियांना देखील शिक्षण घेऊन पुरुषांच्या बरोबरीने काम करता यावे.  हा स्त्री पुरुष समानतावादी दृष्टिकोन समोर ठेवून शिक्षणाची कवाडे समस्त बहुजनांसाठी महामानव क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांनी खुली केली. सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाची स्थापना करून समाजवादी ध्येयाची प्रेरणा सर्वसामान्य जनतेसमोर ठेवून मनुवादी वृत्तीला ठेचून काढण्याचे काम फुले यांनी केले.

      यावेळी  शिवा आधाट, शेवगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. कारभारी गलांडे, खंडू  बुलबुले, गणेश डोमकावळे, राजेंद्र मगर , नंदू मोहिते , जावेद बागवान, बाळासाहेब गोरे, रमेश डाके, प्रदीप मगर, शेखर तिजोरे, संतोष शित्रे, प्रणव डाके, राजेंद्र शित्रे, प्रवीण शित्रे, राहुल सावंत, अविनाश देशमुख, एजाज काझी, हरीश भारदे, तुषार लांडे, कुलदीप फडके नितीन गायकवाड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे, सचिन तुजारे, अमोल पालवे आदिसह नागरीक मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.

        याच कार्यक्रमात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या तसेच आयटकच्या राज्य कौन्सिलवर कॉ.संजय नांगरे यांची निवड झाल्याबद्दल तसेच महात्मा फुले समता परिषदेच्या तालुकाध्यक्षपदी प्रवीण शित्रे यांची निवड झाल्याबद्दल उभयतांचा महात्मा ज्योतिबा फुले कृती समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.