सामाजिक बांधिलकीतून स्व. रामनाथ काळेंच्या स्मृतींना उजाळा – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०४ : रयत शिक्षण संस्थेच्या अनेक शाखांमध्ये स्व. रामनाथ काळे यांनी सेवा करताना त्या शाखांच्या अडचणी सोडवून आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. त्यांनी केलेली सेवा आदर्शवत असून त्यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपातून त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळाला असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभाग अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी केले.

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यु इंग्लिश स्कुलच्या गरजू विद्यार्थ्यांना स्व. रामनाथ काळे सोशल फाउंडेशनच्या वतीने आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेत सेवा देत असतांना रामनाथ काळे सरांनी रयत शिक्षण संस्थेच्या हितासाठी अविरतपणे काम केले. रयत सेवकांचा आवाज होवून रयत मित्र मंडळ, रयत संघ या संघटनेच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेच्या चांगल्या निर्णयाचे स्वागत व चुकीच्या निर्णयाविरोधात आवाज उठविण्याचे काम करून शिक्षकांच्या समस्या सोडविल्या.

रयत मित्र मंडळ व रयत संघाच्या माध्यमातून असंख्य रयत सेवक या संघटनेशी व रामनाथ काळे सरांच्या विचाराशी जोडले जावून त्यांच्या विचारधारेवर रयत शिक्षण संस्थेचे हित जोपासत आहे हि अभिमानास्पद बाब आहे. त्यांच्या उदार विचाराला उजाळा देण्याचे काम सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून होत आहे. स्व. रामनाथ काळे सरांचा आदर्श घेवून अनेक रयत सेवक त्यांचे कार्य पुढे चालवतील असा विश्वास आ. आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.

यावेळी संभाजी काळे, महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिलीप बोरनारे, माजी संचालक बाळासाहेब बारहाते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजणे, रयतचे जनरल बॉडी सदस्य अरुण चंद्रे, बाळासाहेब कासार, गौतम बँकेचे संचालक शिरीष लोहकणे, बाळासाहेब जगताप, 

पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार पतसंस्थेचे संचालक व्यंकटेश बारहाते, संवत्सरचे उपसरपंच विवेक परजणे, सदस्य तुषार बारहाते, सुभाष नाजगड, माजी प्राचार्य मच्छिंद्र पिलगर, पुंजाराम बडवर, विजय आहेर, रविंद्र खर्डे, श्रीकांत काळे, प्रतीक काळे, विनायक राजोळे, मेजर सुखदेव काळे, मेजर विनोद थोरात, मधुकर साबळे, सुनील कुहिले, लक्ष्मण साबळे, अखिलेश भाकरे, ज्ञानेश्वर खैरनार, प्राचार्य मोरे, युवराज गांगवे, स्व. रामनाथ काळे सोशल फाउंडेशन, माहेगाव देशमुखचे सदस्य, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.