वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने संविधान दिना निमित्त वृक्षलागवड

शेवगाव प्रतिनिधी, दि. २६ :  तालुक्यातील आदर्श गाव वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने संविधान दिन विविध कार्यक्रमाचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब शिंगटे यांचे हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार  अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आदर्श वाघोलीचे प्रणेते युवा नेते उमेश भालशिंग यांनी संविधानाचं वाचन केले. त्यानंतर संविधान दिनाचे औचित्य साधून गावात विविध ठिकाणी वृक्षलागवड करण्यात आली.

२६/११ च्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या वीर जवानांना तसेच वाघोली मधील शहीद जवान सोन्याबापु बोरुडे यांचे शहीद स्मारकावर जाऊन अभिवादन करण्यात आले.  यावेळी युवा नेते भालसिंग जेष्ठ ग्रामस्थ काकासाहेब आल्हाट, राजेंद्र जमधडे, उपसरपंच अमोल शेळके, कार्लास आल्हाट, पांडुरंग भालसिंग, गोरख दातिर, दगडू बोरुडे, मोहन गवळी, रमेश भालसिंग, अण्णासाहेब आल्हाट, बाजीराव आल्हाट, सुनील कलकुटे,  भगवान शेंडगे, लक्ष्मण भोसले व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.