राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत श्रीगणेशचा सहभाग

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. २१ : उर्जा मंत्रालय, भारत सरकार यांच्या नोडल एजन्सी NTPC लिमिटेड मार्फत महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी ऊर्जा संवर्धन २०२२ या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. ही स्पर्धा महाराष्ट्रामध्ये एनटीपीसी लिमिटेड, मुंबई या संस्थेमार्फत घेण्यात आली. त्यात श्री गणेश शैक्षणिक संकुल, कोऱ्हाळे येथील इयत्ता १० वी वर्गातील विद्यार्थिनी कुमारी श्रुती सतिष मुर्तडक हिने उत्स्फुर्त सहभाग नोंदविला अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. विजय शेटे यांनी दिली.

उर्जा मंत्रालय भारत सरकार यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ऊर्जा संवर्धनावरील चित्रकला स्पर्धा  ‘अ’ आणि ‘ब’  श्रेणीसाठी घेण्यात आली.ऊर्जा संवर्धन करणे खूपच सोपे असून ऊर्जेचा वापर गरजेपुरता करून ऊर्जेची बचत करता येते.यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये नैसर्गिक वायूविजन, हवा याचा वापर करावा. ऊर्जा संवर्धन ही कोणत्याही प्रकारची तडजोड न करताही करता येते. असे बोलके चित्र तिने रेखाटले होते. तिच्या या कामगिरीबद्दल तीला ५००० धनादेश व प्रमाणपत्र देऊन दिला गौरविण्यात आले.

          विद्यार्थिनीच्या या कामगिरीबद्दल श्रीगणेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.विजय शेटे, उपाध्यक्ष संदीप चौधरी, सचिव नेमिचंद लोढा, विश्वस्थ भारत शेटे, कामिनी शेटे, रवींद्र चौधरी, संदिप सोनिमिंडे, पंकज मुथा, योगेश मुनावत, स्वप्निल लोढा, सुरेश गमे, आकाश छाजेड, चिराग पटेल , गणेश कुऱ्हाडे, प्राचार्य रामनाथ पाचोरे, पंकज खंडांगळे, प्रवीण चाफेकर, निलेश देशमुख यांनी तिचे अभिनंदन केले. ज्ञानेश्वर भिंगारे यांचे तिला मार्गदर्शन लाभले.