संजीवनी एमबीएच्या ९ विद्यार्थ्यांची पीएचएन टेक्नाॅलाॅजिज व बेंचमार्क डेव्हलपर्स मध्ये निवड – अमित कोल्हे

कोपरगांव प्रतिनिधी, दि, ६ : संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स  संचलित संजीवनी एमबीए विभागाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या अतिशय शिस्तबद्ध आणि कृतिशिल कार्यपध्दतीनुसार पीएचएन टेक्नाॅलाॅजिज कंपनीने ६ विध्यार्थ्यांची रू ४. ८६ लाखांच्या वार्षिक पॅकेजवर तर बेंचमार्क डेव्हलपर्स कंपनीने ३ विध्यार्थ्यांची वार्षिक पॅकेज रू ३. ५० लाखांवर नोकऱ्यांसाठी  निवड केली आहे. एका पाठोपाठ एक कंपनी संजीवनीच्या विध्यार्थ्यांना नोकऱ्यांसाठी  निवड करीत असल्याने विध्यार्थी व पालकांमध्ये चैतन्य स्फुरले आहे, अशी  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

वेगवेगळ्या  उद्योगांना सर्विस प्रोव्हायडर म्हणुन नावलौकिक असलेल्या पीएचएन टेक्नाॅलाॅजिज या कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत वार्षिक  पॅकेज रू ४. ८६ लाख देवुन सहा विध्यार्थ्यांची  निवड केली. यात ऋषिकेश  नारायण घोलक, सिध्दी सुनिल गुजराथी, पुजा संतोश रोडगे, अनिकेत महेश  कावडे, दिव्या राजु सोमवंशी  व वैष्णवी  राजेश  त्रिभुवन यांचा समावेश  आहे. फार्म प्लाॅटस्, एनए/रेसिडेंशियल प्लाॅटस्, इंडिस्ट्रियल प्लाॅटस्, रो हाऊस कन्स्ट्रक्शन  आणि प्रापर्टी मेन्टेनन्स इत्यादी क्षेत्रात कार्यरत असलेल्या बेंचमार्क डेव्हलपर्स कंपनीने कॅम्पस मुलाखती घेवुन शशांक  विठ्ठल भुसाळ, श्रृती अनिल गटकळ व जगदिश  मारूती मुंढे यांची वार्षिक  पॅकेज रू ३. ५०  लाखांवर नोकऱ्यांसाठी  निवड केली.

अनेक मोठ्या  कंपन्यांचे  यश  हे तेथिल व्यवस्थापन शास्त्र  म्हणजेच मॅनेजमेंट कौशल्य  असणाऱ्या  व्यक्तींवर असते. जुन्या पध्दती बाद होवुन नामांकित कंपन्या कार्पोरेट विश्वात  गेल्या आहेत तर काही पदार्पण करीत आहे. संपुर्ण जगातील नामांकित कंपन्या आता आधुनिक व्यवस्थापन शास्त्राच्या  जोरावर आगेकुच करीत आहे.

मात्र आधुनिक व्यवस्थापन शास्त्र आत्मसात केलेले सुशिक्षित तरूण तरूणी मिळणे अवघड असते. परंतु संजीवनी एमबीएला ऑटोनॉमस  दर्जा प्राप्त असल्यामुळे व्यवस्थापन शास्त्रातील आधुनिक बाबींचा अंतर्भाव अभ्यासक्रमात केलेला असल्याने कंपन्यांना आधुनिक व्यवस्थापन शास्त्र अवगत केलेले मनुष्यबळ मिळत असल्याने संजीवनी एमबीएचे १०० टक्के विध्यार्थ्यांना नोकऱ्या  मिळवुन देण्याच्या उध्दिष्ट ईऊर्न करण्याच्या दिशेने वाटचाल  सुरू आहे, असे कोल्हे यांनी पत्रकात म्हटले आहे.

या सर्व विध्यार्थ्यांच्या तसेच त्यांच्या भाग्यवान पालकांचा संजीवनी इंजिनिअरींग काॅलेज व एमबीएने भव्य दिव्य अशा  कार्यक्रमात भाजपच्या प्रदेश  सचिव व माजी आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे, संस्थेचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे, विष्वस्त सुमित कोल्हे, डायरेक्टर डाॅ. ए. जी. ठाकुर, विभाग पमुख डाॅ. विनोद मालकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार केला.