कोपरगाव प्रतिनिधी, दि. ७ : जिल्ह्यातील सहकाराची कामधेनू म्हणून ओळख असलेल्या व राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा समजलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या संचालक पदाच्या निवडणुकीची रंगत वाढलेलेली असताना कोल्हे यांनी अलगद बाजी मारून बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग खुला केला आहे.

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेसाठी कोपरगाव सोसायटी मतदारसंघातून संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व आमदार विवेक कोल्हे यांचे अर्ज वैध ठरले असून त्यांच्या विरोधात दोघांनी उमेदवारी अर्ज भरला होता. माञ एकाचा अर्ज तांञिक ञुटीमुळे बाद झाला तर एकाने आपला उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने आता या मतदार संघात संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व आमदार विवेक कोल्हे या दोघा पिता पुञांचा उमेदवारी अर्ज असल्याने आता कोल्हे यांची संचालक पदी निवड हि बिनविरोध झाल्यात जमा आहे. दोघा पिता पुञात कोण संचालकपदी विराजमान होते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

फक्त कोल्हे परिवाराचे अर्ज आहेत. इतर अर्ज अवैध ठरल्याने कोल्हे यांचा जिल्हा बँकेचे संचालक म्हणून बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन अर्ज कोल्हे कुटुंबातून असल्याने आगामी काळात कोणता अर्ज मागे घेतला जाणार आणि कोणाची वर्णी संचालक म्हणून या मतदारसंघातून लागणार याकडे जिल्ह्यातील नेत्यांचे लक्ष लागले आहे.

बिपीन कोल्हे यांना सहकार क्षेञातील परिपूर्ण अभ्यास असुन ते सहकारातील जानते नेते आहेत. त्यांना जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात असलेली जाण ही अतिशय व्यापक आहे. ते जेष्ठ नेते असल्याने जिल्ह्याची कामधेनू असलेल्या या जिल्हा बॅंकेत हा जाणकार नेता संचालक होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तर सहकार साखर कारखानदारीला अधुनिक तंञज्ञानाच्या जोरावर देशाच्या पटलावर अग्रभागी नेण्याचा विक्रम करणारे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार विवेक कोल्हे यांच्या कार्यांची झलक जिल्ह्यातील सर्वच नेत्याना माहीत असल्याने जिल्हा सहकारी बॅंकेच्या संचालकपदी विवेक कोल्हे यांची बिनविरोध वर्णी लागली तर बॅंकेच्या राजकीय हालचालींना वेगळी गती मिळण्याची शक्यता अधिक आहे. विवेक कोल्हे यांच्याकडे असणारी नाविन्यतेची जिद्द व बहुआयामी अभ्यासाची क्षमता यातून जिल्हा बँकेच्या दृष्टीने आगामी काळात कोल्हे कुटुंबातील नक्की कोण प्रतिनिधित्व करणार हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे.

सबंध जिल्ह्याचे लक्ष लागलेली अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँक निवडणूक मोठ्या नाट्यमय घडामोडी घडून पुढे जात आहे. बिनविरोधाचे वारे वाहू लागले असताना अचानक निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाण्याची चर्चा जोर धरत असताना अनेक मतदारसंघात बहुतेकांचे मार्ग मोकळे झाले असून कोल्हे कुटुंबांचे जिल्हा बँकेच्या राजकारणात असलेले महत्व पाहता कोपरगाव मधून दोनच अर्ज वैध ठरल्याने कोल्हे कुटुंबाकडे संचालक पद बिनविरोध आले आहे. माञ अंतिम नाव कुणाचे जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


