संजीवनी अकॅडमीला जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत सिल्वर मेडल

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १ : जिल्हा स्तरीय १४ वर्षाखालील शालेय  मुलांच्या क्रिकेट स्पर्धांमध्ये संजीवनी अकॅडमीच्या संघांने सिल्वर मेडलची कमाई केली. या संघाने एकुण चार सामने जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश केला. सदरच्या स्पर्धा या महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र  राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा परीषद, अहमदनगर च्या वतीने कोकमठाण येथिल आत्मा मालिक शिक्षण संकुलात घेण्यात आल्या, अशी माहिती स्कूलच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे की उपांत्य फेरीत संजीवनी अकॅडमीच्या संघाने आत्मा मालिक संघाला हरवुन अंतिम फेरीत प्रवेश  केला. या सामन्यात आर्यन सांगळे याने २ ओव्हरमध्ये ३ विकेटस् घेतल्या तर रियांश कारवाने २३ बाॅलमध्ये ३४ धावा काढल्या. संपुर्ण सामन्यांमध्ये रियांशने फलंदाजीत तिसरा क्रमांक मिळविला. तसेच आर्यनने संपुर्ण पाच सामन्यांमध्ये ८ विकेटस् घेवुन गोलंदाजीत दुसरे स्थान मिळविले तसेच क्षेत्र रक्षणात चौथे  स्थान मिळविले.

कर्णधार हितेश नरेश दादवाणी याच्या नेतृत्वाखाली खेळाडू कैफ मुस्तक सय्यद, प्रत्युश रविंद्र सुतार, समर्थ बाळासाहेब शेंडगे , कृष्णा संतोष  नवले, पृथ्वीराज देविदास वाबळे, प्रत्युश दिपक जाधव, कृष्णा  निलेश  बागुल, आर्यन संदिप सांगळे, वेदांत दिपक वारूळे, आर्यन नितीन नारखेडे, रियांश  जयप्रकाश  कारवा, स्वरीत मनोज गोळेचा, आयुष मनोज उदावंत, आदित्य सुभाष  बरवंट, समर रघुवीर सैनी व आर्यन सुनिल आहेर यांनी उत्कृष्ट  खेळाचे प्रदर्शन  केले. त्यांना क्रिकेट कोच कृष्णा सुरासे यांचे मार्गदर्शन लाभले. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व स्कूलच्या संचालिका डाॅ. मनाली कोल्हे यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.