कोल्हे साखर कारखाना कार्यस्थळावर गुरूचरित्र पारायण सुरू

 कोपरगांव प्रतिनिधी, दि. १ : सालाबादप्रमाणे याही वर्षी दत्तजयंती निमीत्त सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे व कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली श्री स्वामी समर्थ दिंडोरीप्रणित प. पू. मोरेदादा यांच्या आर्शिवादाने दत्त जयंती निमीत्त श्रीगुरूचरित्र पारायण सोहळयास कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. संजीवनी सुतार या उभयतांच्या हस्ते सुरूवात करण्यांत आली. 

            याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी स्व. शंकररावजी कोल्हे यांच्या आठवणींना उजाळा दिला. अध्यात्म व विज्ञान यांची सांगड घालुन जर जीवनाची वाटचाल केली तर निश्चितपणे एक सुजाण नागरिक व त्याबरोबर एक सदृढ समाज घडतो. सदर प्रसंगी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांना एसएसआरडी मार्फत ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड’ मिळालेबददल त्यांचे सर्वांचे वतीने अभिनंदन करणेत आले व कारखान्याच्या प्रगतीतुन अनेक पारितोषके मिळणेसाठी सर्वजण कटीबध्द असल्याचेही ते शेवटी म्हणाले. 

            गेल्या सोळा वर्षापासुन कारखाना कार्यस्थळावर श्री गुरूचरित्र पारायण सोहळयाचे यशस्वी आयोजन केले जाते. यंदाचा तेहतिसावा पारायण सोहळा असुन त्यात ११० पारायणार्थी सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन चंद्रकांत जाधव यांनी केले. याप्रसंगी कारखान्यांचे सर्व अधिकारी, पदाधिकारी, खाते प्रमुख, उपखातेप्रमुख कर्मचारी वृंद, महिला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते.