खुले नाट्गृहचे काम कधी पूर्ण होणार ? – माजी नगरध्यक्ष पाटील

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ : कोपरगावातील नाट्यप्रेमी जनता, नागरिक, शाळेतील लहान मुले मुली व कलाकार यांच्या साठीचे स्टेज व नाट्य गृहाचे नूतनीकरण पूर्ण होऊन त्याचा लाभ घेण्यासाठी आसुसुलेल्या नाट्यरसिकांसाठी हे काम कधी पूर्ण होणार म्हणून अनेक वर्षांपासून वाट बघत आहे.

             गेल्या सव्वा वर्षा पूर्वी सुरू केलेले सुमारे १ कोटी रुपयाचे नूतनीकरणाचे काम सुरू होऊन आद्याप काम पूर्ण झाले नाही. इतका मोठा निधी येऊन देखील जर दिलेल्या मुदतीत हे काम पूर्ण झाले नाही, याला जबाबदार कोण? असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला आहे.                

    नगरपालिकेत मुख्याधिकारी हे मुख्याधिकारी व प्रभारी नगराध्यक्ष ( प्रशासक ) म्हणून दोन्ही पदांवर काम करत आहे. नगरपालिकेचे मुख्य म्हणून त्यांनी नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या ह्या कामाकडे लक्ष देऊन हे काम खरे तर चांगल्या दर्जाचे करून घ्यायला पाहिजे होते. आद्यप हे काम का पूर्ण झाले नाही, त्या निधीची किती रक्कम आज पर्यंत खर्च केली व किती काम झाले याचा खुलासा नगरपालिकेने जनतेला करावा.

           कोपरगावातील नाट्यप्रेमी कलाकार या नूतनीकरनाची गेल्या अनेक वर्षांपासून वाट बघत होते. त्यांना प्रॅक्टिससाठी व नाट्यप्रयोग करण्यासाठी हे नाट्यगृह पूर्ण होणे गरजेचे होते. आत्ता हा महिना व पुढील महिन्यात गावातील प्रतेक शाळेमध्ये लहान मुलाचे ग्यादरिंग, संस्कृतीत कार्यक्रम शाळेतील मुले मुली सदर करतात. त्याच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी व मिळण्यासाठी त्यांना इतके मोठे स्टेज हे गावातील सर्वच शाळांमध्ये उपलब्ध नाही.

काही शाळा पूर्वी  या नाट्यगृहाचा उपयोग ग्यादरींगसाठी करीत असे. बरेच नाट्यप्रेमी आहेत की, जे निःशुल्क मुला मुलींना शिकवत असतात. त्यांना ही कोपरगाव मध्ये दुसरी जागा नाही ते या नाट्य गृहाचा उपयोग करीत असत. शिवजयंतीच्या निमित्ताने मोठे सांस्कृतिक कार्यक्रम ह्या लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नाट्यगृहात होत.

 पूर्वी सांगायचे की निधी नाही आणि आत्ता मोठा निधी (१ कोटी रुपये ) उपलब्ध होऊन देखील गेल्या वर्षापासून काम होत नाही. याचा खुलासा पालिकेने करावा व याला जबाबदार कोण हे सांगावे. जनता कर व टॅक्स भरते. भरलेल्या करातून पैशातून शासन नगरपालिकेला जनतेच्या हिताचे काम करण्यासाठी पैसे देते, म्हणून जनतेला त्या कामाबद्दल व निधीच्या विनियोग कसा व किती झाला व कामाचे स्टेटस विचारण्याचा हक्क आहे.  तरी हे काम तातडीने पूर्ण करावे ही मागणी पाटील यांनी केली आहे.