डॉ.क्षितीज घुलेच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

शेवगाव प्रतिनिधी, दि. १५ : शेवगाव पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितिज घुले यांच्या वाढदिवसानिमित्त शेवगाव तालुक्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

        ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी कार्यरत असलेल्या येथील उच्चल फाउंडेशनला डॉ.घुले पाटील यांच्या ३७ व्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादी युवक संघटनेच्या वतीने वतीन ३७ हजार रुपये रोख मदत देण्यात आली.

ज्येष्ठ नेते अरुण पाटील लांडे ,राष्ट्रवादीयुवक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष  संजय कोळगे, मौलाना अब्दुल हाफिज साहेब,तालुका अध्यक्ष कैलास नेमाने, सचिन खेडकर वसुधा सावरकर डॉ.सुधाकर लांडे, तालुका विकास अधिकारी भाऊसाहेब चेके यांच्या सह  शहरातील विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. तर दहिगावने योे रक्तदान शिबिर व वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी प्रा. बाळासाहेब मंडलिक म्हणाले, लोकनेते स्वर्गीय मारुतराव घुले पाटलांच्या विचारांचा वसा त्याच कार्यशैलीत पुढे चालवणारे डॉ क्षितिज घुलेंच्या रूपाने युवा नेतृत्व समाजकार्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहे. संस्थेचे कार्यकारी अधिकारी के. वाय. नजन यांनी प्रास्ताविक तर प्राचार्य अशोक उगलमुगले यांनी स्वागत केले. प्रा. मकरंद बारगुजे यांनी आभार मानले.