कोपरगाव प्रतिनिधी, दि.१३ : कोपरगाव येथे मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबीर स्व. भागचंद धनराज ठोळे यांच्या स्मरणार्थ, लायन्स, लिनेस व लिओ क्लब ऑफ, ज्येष्ठ नागरीक सेवा मंच, ठोळे उद्योग समुह, व प्रवरा मेडीकल ट्रस्ट लोणी यांचे संयुक्त विद्यमाने रविवार दि १६ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोपरगाव शहरात मोफत सर्व रोग निदान व उपचार, मेडीसीन -हृदयविकार, मेंदूविकार, मधुमेह, दमा, छातीचे (श्वसन) विकार, शल्यचिकित्सा शरीरावरील गाठी, गोळे, मुत्ररोग, पित्ताशयातील खडे, पोटाचे आजार इ., कान, नाक, घसा : कान, नाक, घसा, बहिरेपणा, नाकातील गाठ, आवाजातील बदल, कानफुटी, नेत्रचिकित्सा मोतीबिंदू, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, रांजणवाडी इ.,अस्थिरोग- हाडाचे आजार, हाड मोडणे, संधीवात,
सांधे तपासणी इ.,गर्भपिशवीचे आजार – पाळीचा त्रास, गर्भशयाच्या गाठी इ., स्त्री रोग, बालरोग – बालकांचे सर्व आजार, लसीकरण, त्वचा रोग – पांढरे डाग, चट्टा, कुष्ठरोग, गुप्तरोग, दंतरोगचिकित्सा दात किडणे, दातदुखी, अर्धवट ओठ व टाळुत छिद्र, फिजीओथीएरपी,भौतिक उपचार, मानसोपचार – मानसिक आजार, वेडरसरपणा, उदासिनता, वेसनमुक्ती (दारू, गांजा) लैगिक समस्या, मेंदूचे आजार,एक्स रे, रक्त लघवी आदींसह अनेक आजारांची तपासणी करण्यात येणार आहे.
वरील तपासण्यानंतर गरज पडल्यास पुढील उपचार अथवा ऑपरेशन प्रवरा हॉस्पिटल मध्ये करण्यात येईल तर उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये अॅडमीट करणेसाठी रुग्णांना प्रवरा रुग्णालयापर्यंत आणण्याची मोफत सोय केलेली आहे. अॅडमीट झालेल्या रुग्णांची तपासणी व उपचार मोफत केली जाणार आहे तरी गरजुंनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन स्व. भागचंद धनराज ठोळे यांच्या स्मरणार्थ लायन्स, लिनेस व लिओ क्लब ऑफ, ज्येष्ठ नागरीक सेवा मंच, ठोळे उद्योग समुह, व प्रवरा मेडीकल ट्रस्ट लोणी यांचे वतीने करण्यात आले आहे.