अवैध वाळु वाहतुक करणा-या ढंपरवर कारवाई

शेवगाव प्रतिनिधी, दि. ०२ : उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील व शेवगाव पोलिस ठाण्याचे परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी बी. चंद्रकांत रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या, वाहन चालकावर कारवाई करत तब्बल ४ लाख ३५  हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रेड्डी यांना बुधवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास मुंगीतून वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावरून त्यांनी लगेच सपोनि आशिष शेळके, पोहेकॉ नानासाहेब गर्जे, पोकॉ/बप्पासाहेब धाकतोडे, पोकॉ/राहुल खेडकर, पोकॉ/गणेश गलधर यांना या बाबत कारवाई करण्याच्या सुचना दिल्या, त्यानुसार पथकाने पहाटे ५  चे सुमारास मुंगी गावातून पैठण रस्त्याने जाणारे वाळू वाहतूक करणारे ढंपर चालक संजय गुलाब पठारे वय- ४७ वर्षे रा. दादेगाव ता. शेवगाव जि. अहमदगनर यास अडविले.

 त्यांच्याकडे कुठलाही परवाना आढळून आला नाही. सदर ढंपर चालकाने शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर वाळू वाहतूक केली, असल्याने शेवगाव, पोलिस स्टेशन येथे सदर ढंपर चालकावर पर्यावरण कायदा, अधिनियम कायदा, कलम ३, १५ खाण खनिज अधिनियम ४, २१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.