शेवगाव प्रतिनिधी, दि.१ : तालुक्यात पार पडणाऱ्या १२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी गुरुवारी सरपंच पदासाठी ११ तर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी ६५ असे एकूण ७६ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून आज अखेर सरपंच पदासाठी २५ तर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी ४० प्रभागातील ११६ जागांसाठी १२३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्यासाठी वारंवार सर्व्हर डाऊन होवून मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनेनुसार गुरुवारी ऑफ लाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाल्याने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला . उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आज शुक्रवारी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास संध्याकाळी ५.३० पर्यंत वेळ वाढवून दिला असल्याने शुक्रवारी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाल्याने इच्छुकांचा आनंद द्विगुणीत झाल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.
जनतेतून पार पडणाऱ्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी गाव निहाय दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची संख्या पुढील प्रमाणे – अमरापूर ४, रावतळे – कुरुड्गाव२, भायगाव, खामगाव, दहीगावने, रांजणी, खानापूर प्रत्येकी १, तर सदस्य पदाच्या गावनिहाय दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची संख्या पुढील प्रमाणे – रावतळे – कुरुड्गाव १९, अमरापूर १०, दहीगावने ९, खामगाव ८, भायगाव ६, सुलतानपूर बु ५, खानापूर ४, वाघोली ३, रांजणी १