कोपरगांव प्रतिनिधी, दि. २ : संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निक आयोजीत व इंटर इंजिनिअरींग स्टूडंटस् स्पोर्टस् प्रायोजीत ई १ झोनच्या विभागीय पातळीवरील मुलांच्या बास्केटबाॅल स्पर्धांमध्ये संजीवनी पाॅलीटेक्निकच्या संघाने गव्हर्नमेंट पाॅलीटेक्निक, अहमदनगर संघाविरूध्द अंतिम सामन्यात दणदणीत विजय मिळविला. पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बास्केटबाॅल स्पर्धेत सुध्दा यश प्राप्त करण्याचे उद्धिष्ट ठेवत खेळाडू सराव करीत आहे, अशी माहिती संजीवनी पाॅलीटेक्निकने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की, कर्णधार यश साबळे याच्या नेतृत्वाखाली, अर्पित गायकवाड, प्रथम गाडे, कुणाल पवार, सोहम येशी कृष्णा कड, गोपाल भुंजे, आदित्य भांगे, ओम राजगुरू, एम.डी. लारायब अलम, साई नवले व आर्यन दुसाने यांनी उकृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या खेळाडूंना क्रीडा संचालक प्रा. शिवराज पाळणे व प्रा. गणेश नरोडे यांचे मार्गदर्शन लाभले.
जगाच्या पाठीवर संजीवनीचे विध्यार्थी कोठेही गेले तरी त्यांनी संजीवनीच्या प्रयत्नातुन विकसीत केलेल्या अंगीभुत कौशल्याच्या जोरावर आपले वेगळेपण सिध्द करावे, या हेतुने त्यांच्यातील सुप्त कौशल्यांना विकसीत करण्यासाठी संजीवनीचे व्यवस्थापन खेळाला सुध्दा शैक्षणिक गुणवत्ते इतकेच महत्व देत असुन त्यामुळेच संजीवनीचे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात नवनवीन किर्तीमान स्थापित करीत आहे.
खेळाडूंच्या यशाबद्धल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे व जीमखाना प्रमुख डी. एन. सांगळे यांनी त्यांचे अभिनंदन करून राज्यस्तरीय सामन्यांमध्ये यश मिळविण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच अमित कोल्हे यांनी सर्व खेळाडूंचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी प्राचार्य ए. आर. मिरीकर, विभाग प्रमुख प्रा. गणेश जोर्वेकर, प्रा. प्रविण खटकाळे, प्रा. मोहिनी गुंजाळ, प्रा. पाळणे व प्रा. नरोडे उपस्थित होते.