शेवगाव प्रतिनिधी, दि. २ : शेवगांव व पाथर्डी तालुक्यातील नवीन ५९ तलाठी कार्यालयाच्या बांधकामासाठी रु. १५ कोटी ७५ लक्ष मंजूर झाल्याची माहिती आमदार मोनिकाताई राजळे यांनी दिली. यात शेवगांव तालुक्यातील ३४ गांवातील तलाठी कार्यालय बांधकामासाठी ९ कोटी १८ लक्ष व पाथर्डी तालुक्यातील २५ गांवातील तलाठी कार्यालयासाठी रु. ६ कोटी ५७ लक्ष रक्कम मंजूर झाली आहे.
या कामासाठी राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यामुळे प्रस्तावीत केलेल्या सर्व प्रस्तावांना शासन निर्णय, क्र.बीएलडी-२०२२/प्र.क्र.११६/ई८ नुसार महसूल विभागाने मंजूरी दिली. यामध्ये शेवगांव तालुक्यातील वरुर बुद्रुक, अमरापुर, खरडगांव, ठाकुरनिमगांव, कोळगांव, आखेगांव, जोहरापुर, देवटाकळी, शहरटाकळी, भाविनिमगांव, दहिगांव ने , बोधेगांव, लाडजळगांव, राणेगांव, गोळेगांव, बालमटाकळी, कांबी, हातगांव, खडके,
मुंगी, आंतरवाली बु., ठाकुरपिंपगांव, राक्षी, ढोरजळगांव शे, ढोरजळगांव ने , सामनगांव, आव्हाणे बु., वाघोली, निंबे, दहिफळ , खुंटेफळ, खानापुर, गदेवाडी, घोटन त्याचबरोबर पाथर्डी तालुक्यातील सांगवी बु., मढी, निंवडूगे, साकेगांव, पाडळी, आल्हणवाडी, जाटदेवळे, चिंचपुर इजदे, करोडी, कारेगांव, टाकळीमानुर, अकोला, चिंचपुरपांगुळ, जांभळी, येळी, भालगांव, सुसरे, दुलेचांदगांव, निपाणी जळगांव, लोहसर, मोहोज बु., मांडवे, शिराळ, आडगांव, कासारपिंपळगांव या गांवाचा तलाठी कार्यालय बांधकामांचा समावेश आहे.
ग्रामीण भागात तलाठी, शासन व नागरिक, शेतकरी यांच्यामधील महत्त्वाची भूमिका निभावत असतो. जमिनी संबंधित अभिलेखन सतत अद्यावत राहावीत तसेच वेगवेगळ्या नोंदीसाठी नागरिकांना नेहमीच तलाठी कार्यालयाची आवश्यकता भासते. गावात तलाठी कार्यालय झाल्याने सामान्य नागरिकांचे कामकाज सोयीस्कर होण्यास नक्कीच मदत होईल. गेले अनेक वर्षापासून या गावात तलाठी कार्यालय इमारत नसल्याने गैरसोय होत होती.
मागील वर्षापासून या कार्यालयाचे इमारत बांधकाम होण्यासाठी पाठपुरावा सुरु होता. नामदार राधाकृष्ण विखे पाटील, महसूल मंत्री झाल्यानंतर या प्रस्तावास गती मिळून मागणीनुसार सर्व प्रस्तावीत तलाठी कार्यालयांना त्यांनी मंजूरी दिली. त्याबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आमदार मोनिका राजळे यांनी आभार मानले.