अमरापूरच्या देवस्थानात रेणुका माता जन्मोत्सव सोहळा साजरा

शेवगाव प्रतिनिधी, दि. १२ :   मंगळवारी (दि ११ ) चैत्र कृष्ण पंचमी, श्री रेणुकामातेचा जन्म दिवस, शेवगाव तालुक्यातील श्री क्षेत्र अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात हा जन्मोत्सव सोहळा मोठ्या जल्लोषात भक्ती भावे साजरा करण्यात आला.

प्रातःसमयी आईसाहेबाना दुग्धाभिषेक घालण्यात आला असून भरजरी शालू व सुवर्णालंकारानी मातेचा श्रृंगार करण्यात आला आहे. मंदिराच्या गाभार्‍यात असंख्य तेलतुपाचे दिवे लावून झगमगाट करण्यात आला.  साडे अकराला महाआरती झाल्या नंतर भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली.

       श्री रेणुका माता मल्टी स्टेटचे प्रवर्तक ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. प्रशांत भालेराव यांनी पूजा बांधली असून देवस्थानचे पुजारी तुषार देवा व अन्य ब्रह्मवृंदानी पौरोहित्य केले. दिवसभर पंचक्रोशीतील भाविक भक्तांची आईसाहे बांच्या दर्शना साठी रीघ लागली होती.

रेणुका भक्ता नुरागी मंगलताई व जयंती भालेराव , पाथर्डीचे प्रथम नगराध्यक्ष सुभाष घोडके, माजी नगराध्यक्षा जनाबाई घोडके, कोरडगावचे  दामू अण्णा काकडे, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे नवनियुक्त सेवक संचालक श्रीमंत घुले, सार्वजनीक बांधकाम विभागाचा अधिकारी वर्ग, सब रजिस्ट्रार कोमल गायकवाड, अॅड रघुनाथ   राठी, सामाजिक कार्यकर्ते अनिल वडागळे,पार्थर्डीच्या हिंदू रक्षा मंचचे स्वयं सेवक आदि सह भाविक भक्तांची रात्री उशीरा पर्यंत दर्शना साठी वर्दळ सुरु  होती.