शनीदेवावर तेल वाहण्याऐवजी दान पेटीत वाहिले तेल

Mypage

हा खोडसाळपण की, अंधश्रधा पोलीस घेतायत शोध

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि. २८ :  अलीकडे काही दिवसात लौकिक पावलेल्या व भाविकांचे श्रध्दास्थान बनलेल्या तालुक्यातील ताजनापुर येथील श्री शनेश्वर देवस्थानाची दानपेटी नेहमीप्रमाणे पंचाच्या व भाविकाच्या उपस्थितीत उघडण्यात आली असता ती मध्ये तेल आढळून आले.

tml> Mypage

भाविकांनी दानपेटीत टाकलेल्या नोटा चिल्लर तेलामध्ये भिजलेल्या आढळल्या. या अगोदरही दोन वेळेस असाच प्रकार  घडला असल्याने येथील भाविकांनी लगेच शेवगाव पोलिसांना कळविले. शेवगाव पोलिसांनी देखील त्याची दखल घेत प्रत्यक्ष पाहणी करून त्या ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांचे मार्गदर्शनाखाली हे.कॉ. दादासाहेब शेळके या विषयी शोध घेत आहेत.

Mypage

अशा प्रकारची घटना घडण्याचा ही तीसरी वेळ असल्याने हे चूकून घडलेले कृत्य नसून कुणा माथेफिरुचे मुद्दाम जाणूनबुजून केलेले हे काम असावे. अशा प्रकारच्या प्रतिक्रीया यावेळी ग्रामस्थ व्यक्त करत असून दोषीला लवकरात लवकर शोधून त्यास शासन व्हावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

Mypage

     या वेळी अप्पासाहेब वीर, नवनाथ अमृत, कैलाश नजन, भाऊराव वीर, राजेंद्र वीर ,सचिन आरले, अशोक वीर, गणेश नजन, रमेश वीर,  महादेव वीर, प्रणव नजन, ज्ञानदेव वीर, अमोल लंगोटे, रावसाहेब वीर, भाऊराव लंगोटे, शंकर लंगोटे, करभारी वीर, आदि भाविक उपस्थित होते. 

Mypage