शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा क्रांती चौकात जल्लोष

शेवगाव प्रतिनिधी, दि. १८ : शिवसेनेच्या दीर्घकाळ चाललेल्या लढ्यात अखेर निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने कौल दिला. रात्री साडेसातचे सुमाराला निकालाची बातमी समजताच  शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी येथील क्रांती चौकातील पावन गणपती  मंदिरासमोर  एकत्रित येऊन मोठा जल्लोष केला यावेळी शिवसेना जिंदाबाद, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिंदाबाद, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे अमर रहे ! अशी प्रचंड घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून मोठा जल्लोष केला.

      शिंदे गटाचे युवा सेना जिल्हाप्रमुख साईनाथ आघाट, तालुकाप्रमुख अशुतोष डहाळे, भारतीय जनता पार्टीचे नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी एकमेकांना, कार्यकर्त्यांना व ग्रामस्थांना पेढे भरवले. यावेळी  प्रभाकर गायकवाड, अशोक पुरनाळे, आशुतोष पुरनाळे, मधुसूदन धूत, विशाल परदेशी, मनोज राऊत, विकास गंगावणे, अनिल वडागळे, संदीप लांडगे, प्रसाद डाके, देविदास कुरुंद आदी पदाधिकाऱ्यांनी  मोठा जल्लोष केला.