ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांचा जाहीर निषेध

शेवगाव प्रतिनिधी, दि.२७ : यवतमाळ येथे थोर समाज सुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळयावर कोणीतरी अज्ञात समाज कंटकांनी काळा कलर फेकुन विटंबना केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे देशातील बहुजन समाजाच्या भावना दुखावुन समाजाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सनातनी लोकांनी क्रांतीबा ज्योतीबा फुले हयात असतांनाही त्यांना अशाच पध्दतीने त्रास देण्याचे काम केले. ही अत्यंत खेदजनक बाब आहे. या घटनेचा शेवगाव तालुक्यातील सर्व जनतेच्या वतीने जाहिर निषेध करण्यात आला. तहसिलदार प्रशांत सांगडे व पोलिस निरीक्षक रविंद्र मगर यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी काॅ.संजय नांगरे, खंडू बुलबुले, बाळासाहेब डाके, नितिन घुसाळे, किसन लिंगे, अरुण गायकवाड, अमोल शेळके, राहुल मगरे, नामदेव नांगरे, सोनू साखरे, अमोल हिवाळे, अविनाश देशमुख, संजय लहासे, जयराम गायधने, निखिल केळकर अमोल घोलप आदिसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.