संजीवनी इंजिनिअरींगच्या १८ अभियंत्यांची फोर्स मोटरमध्ये निवड

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २५ : संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजचा ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग (टीअँड पी) सतत विविध नामांकित कंपन्यांच्या संपर्कात राहुन कंपन्यांना कोणत्या आधुनिक तंत्रज्ञानाधिष्टित अभियंत्यांची गरज असते, याची चाचपणी करतो. अशाच  प्रयत्नातुन फोर्स मोटर्स या वाहन उद्योगातील आघाडीच्या कंपनीशी  संपर्क साधुन कंपनीला अभिप्रेत असलेल्या ज्ञानाचे अधिकचे प्रशिक्षण  देवुन कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन केले होते. यात कंपनीने मेकॅनिकल, मेकॅट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकल इंजिनिअरींच्या अंतिम वर्षातील १८ अभियंत्यांची नोकरीसाठी आकर्षक  पगारावर निवड केली. अशा  प्रकारे टी अँड  पी विभागाची एकापाठोपाठ धडाकेबाज कामगिरी सुरू असल्याचे महाविद्यालयाने प्रसिध्द केलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे.

  फोर्स मोटर्सने निवड केलेल्या अभियंत्यांमध्ये अभिजीत रमेश आदिक, ऋषिकेश  बाळासाहेब कोल्हे, गणेश  लक्ष्मण धोत्रे, धिरज संजय भोसले, श्रीराम  नवनाथ ढाकणे, ओंकार  दत्तात्रय काळे, प्रमोद तुळशीराम  काळे, श्रेयश  अविनाश  पाटील, ईश्वरी  संतोश शिंदे , श्रुती विनोद वाघमारे, अनिकेत दत्तात्रय जगताप, सृष्टी  अरविंद गाडेकर, पियुष  नानासाहेब मुंजाळ, निलिमा संजय बनकर, सौरभ विलास गवळी,सुजित संतोष  सोनवणे,पूजा धरम यादव व जुई पंकज बनकर यांचा समावेश  आहे.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी निवड झालेल्या सर्व अभियंत्यांचे, त्यांच्या पालकांचे तसेच डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर, डीन टी अँड  पी डॉ. विशाल तिडके व त्यांच्या सर्व टीमचे अभिनंदन केले.

मी राहाता येथिल शेतकऱ्याची  मुलगी. शिकून  चांगली नोकरी मिळावी, ही सर्वांचीच इच्छा असते. तशी  इच्छा माझी व माझ्या आई वडीलांची इच्छा होती. नोकरी देणारे असे कोणते शाश्वत  ठिकाण आहे, यावर संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजवर आम्ही शिक्कामोर्तब केले. कारण आमच्या नातेवाईकांमधिल एका मुलीला येथुनच ब्रिस्टॉन कंपनीमध्ये चांगल्या पगारावर नोकरी मिळाली. तसेच या महाविद्यालयाचा महाराष्ट्राच्या  ग्रामिण भागातुन सर्वाधिक नोकऱ्या  मिळवुन देणारे महाविद्यालय असा नावलौकिक आहे. म्हणुन मी येथेच इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग शाखेला  प्रवेश  घेतला. हे महाविद्यालय ऑटोनॉमस दर्जा प्राप्त असल्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे मिळाले. टी अँड  पी विभागाने मुलाखतीची पुर्ण तयारी करून घेतली आणि माझी फोर्स मोटर्स मध्ये निवड  झाली.  संजीवनीमुळे माझी व माझ्या आई वडिलांचे नोकरीचे स्वप्न पुर्ण झाले. -नवोदित अभियंता मुलगी श्रुष्टी  गाडेकर