युवराजांनी अपुरी माहिती प्रसिद्ध करू नये –  दिलीपराव बोरनारे 

Mypage

अजूनही ६००० शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित 

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : प्रोत्साहनपर अनुदानापासून जवळपास ६००० शेतकरी वंचित असून त्यांना हे अनुदान मिळवून देण्यासाठी आ. आशुतोष काळे पाठपुरावा करीत असून त्यासाठी वंचित पात्र शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेतले जात आहे. मात्र याची पूर्ण माहिती नसणाऱ्या युवराजांनी अपुऱ्या माहितीच्या आधारावर चुकीच्या बातम्या प्रसिद्ध करू नये असा उपरोधिक सल्ला कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन दिलीपराव बोरनारे यांनी जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांना नाव न घेता दिला आहे. 

Mypage

त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेवून नियमित कर्जफेड करणाऱ्या कर्जदार शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ५० हजार रुपये देण्याचे जाहीर केले होते. त्या निर्णयाची अंमबजावणी होवून १ हजार ३२३ शेतकऱ्यांना हे अनुदान यापूर्वीच मिळाले आहे.

Mypage

मात्र अजूनही जवळपास ६००० शेतकरी या प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित आहेत. त्यासाठी आ. आशुतोष काळे पाठपुरावा करीत असून त्यासाठी अनुदान मिळण्यास पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेतले जात आहे. याची माहिती युवराजांना नाही. त्याची त्यांनी सविस्तर माहिती घ्यावी. लवकरच या शेतकऱ्यांना देखील हे अनुदान मिळणार आहे.

Mypage

ज्यावेळी या शेतकऱ्यांना हे प्रोत्साहनपर अनुदान मिळेत त्यावेळी युवराजांनी खुशाल बातम्या प्रसिद्ध करून श्रेय घ्यावे, कोणतेही योगदान नसतांना असा टोला विवेक कोल्हे यांचे नाव न घेता व्हा. चेअरमन दिलीप बोरनारे यांनी लगावला आहे. 

Mypage

खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा होणे गरजेचे आहे. त्यासाठी  फक्त बातम्या प्रसिद्ध करून पैसे मिळणार नाहीत. त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो. अनुदानापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरात लवरकर अनुदान मिळावे यासाठी आ. आशुतोष काळे यांचा पाठपुरावा सुरु आहे.

Mypage

१३२३ शेतकऱ्यांना अनुदान मिळाले आहे हे सगळ्यांना माहित असतांना अर्धवट माहितीच्या आधारे युवराजांनी चुकीच्या बातम्या प्रसिद्ध करून हसू करून घेवू नये असा सल्ला व्हा. चेअरमन दिलीपराव बोरनारे यांनी जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांना नाव न घेता दिला आहे.

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *