सहा चोरांच्या आवळल्या मुसक्या
कोपरगाव प्रतिनिधी दि. ०२ : कोपरगाव शहरासह तालुक्याच्या विविध ठिकाणांहून मोटारसायकली चोरणारी टोळी सक्रिय होती. बऱ्याच दिवसांपासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. अखेर कोपरगाव शहर पोलिसांनी मोटारसायकलीसह चोरणाऱ्या टोळीतील सहा जनांना जेलबंद करुन मोटारसायकल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला.
या घटनेची पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, २४ मे २०२३ रोजी सागर धनिशराम पंडोरे रा. ब्राम्हणगाव यांची मोटारसायकल एम.एच.१७ सी.जी.११३४ ही चोरीला गेल्याची तक्रार दिली होती. गेल्या अनेक दिवसांपासून कोपरगाव तालुक्यासह शेजारच्या तालूक्यातुन मोटारसायकली चोरीचे प्रमाण वाढल्याने अखेर कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी मोटारसायकली चोरणाऱ्या टोळीच्या शोधात एक स्वतंत्र पथक तयार केले.
पोलीस उपनिरीक्षक रोहीदास ठोंबरे यांच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शोध मोहीम सुरु केली. चोरीच्या गाड्या खरेदी केलेल्या संशयितांची धरपकड सुरू केली आणि काय आश्चर्य म्हणावे ज्या ब्राम्हणगावातील तक्रारदाराने मोटारसायकल गेल्याची तक्रार दिली त्याच गावातील मोटारसायकल चोरांची टोळी तपासात निष्पन्न झाली.
गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरुन कोपरगाव येथुन चोरलेल्या मोटारसायकली नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे विकल्या आहेत. पोलीस उपनिरीक्षक रोहीदास ठोंबरे हे आपल्या पथकासह सिन्नर येथे जावून गणेश जेजूरकर या संशयतास ताब्यात घेवून कसुन चौकशी केली असता. त्याने दिनेश राजेंद्र आहेर, वय ३० वर्षे व अजित जेजुरकर हे दोघे रा. ब्राम्हणगाव ता. कोपरगाव या साथीदारांच्या मदतीने विविध ठिकाणच्या मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली.
तिघांना ताब्यात घेवुन सखोल चौकशी केली असता, यांनी पाच मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. तसेच चोरलेल्या मोटारसायकली शिरपूर जि. धुळे येथे विकल्याचे सांगितले. प्रविण सुका कोळी, प्रमोद झुंबरलाल कोळी, हर्षल राजेंद्र राजपूत, सर्व राहणार उपरपिंड या शिरपूर जि. धुळे यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे विकलेल्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. यामध्ये पाच मोटारसायकली व सहा मोटारसायकली चोरांना ताब्यात घेतले आहे.
पाच मोटारसायकली पैकी, दोन कोपरगावच्या हद्दीतून, दोन कोपरगाव ग्रामीण मधुन व एक येवला ग्रामीण हद्दीतून चोरल्याची कबुली दिली आहे. ही टोळी पकडण्यासाठी पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपाधिक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, पोलीस उपनिरीक्षक रोहीदास ठोंबरे, पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, पोलीस कर्मचारी डी.आर. तिकोने, ए.एम. दारकुंडे, राम खारतोडे, जी. व्ही. काकडे, महेश गोडसे, जालिंदर तमनर, संभाजी शिंदे, ज्ञानेश्वर भांगरे, विलास मिसाळ, एम. आर. फंड, बाळू धोंगडे आदींनी परिश्रम घेतले.