तालुकास्तरीय स्पर्धांमधुन राष्ट्रीय खेळाडू घडतात – सुमित कोल्हे

 संजीवनी ज्युनिअर काॅलेजमध्ये तालुकास्तरीय व्हाॅलीबाॅल स्पर्धांचे उद्घाटन

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १७ : शालेय  अथवा महाविद्यालयीन जीवनातील कोणत्याही खेळाचे सामने असोत, संपुर्ण संस्थेतुन एक संघ निवडला जातो, तो तालुका पातळीवरून जिल्हा तसेच राज्य आणि नंतर राष्ट्रीय पातळीवर जातो. यावरून राष्ट्रीय  खेळाडू होण्यासाठी तालुकास्तरीय स्पर्धांमधिल सहभाग हा पाया असुन त्यातुन खेळाडूंना आपल्यामधिल क्षमतांची जाणिव होते, आणि यातुनच पुढे खेळाचे उत्तम प्रदर्शन करणारे राष्ट्रीय खेळाडू बनतात. म्हणुन या सामन्यांमध्ये आपल्यातील कसब दाखविण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी केले.

अहमदगनर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी ज्युनिअर काॅलेजच्या संयुक्त विद्यमाने संजीवनी ज्युनिअर काॅलेजच्या सर्व सोयींनी परीपुर्ण अषा व्हालीबाॅल मैदानावर शालेय  तसेच ज्युनिअर काॅलेजच्या १४,१७ व १९ वर्षे  वयोगटांतर्गत मुलांच्या व मुलींच्या तालुकास्तरीय स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी कोल्हे बोलत होते. अध्यक्षस्थनी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे होते.

यावेळी व्यासपीठावर संगणक तज्ञ श्री विजय नायडू, नाॅन अकॅडमीक्स डायरेक्टर श्री डी. एन. सांगळे, प्राचार्य डाॅ. आर. एस. शेंडगे , माजी व्हाॅलीबाॅल पटू श्री राजेंद्र पाटणकर उपस्थित होते तर तीनही वयोगटातील मुले व मुलींच्या एकुण ४२ संघांनी या सामन्यांमध्ये सहभाग नोंदविला. उद्घाटनपर सोहळा झाल्यानतर श्री अमित कोल्हे व श्री सुमित कोल्हे यांनी पहिल्या सामन्याचे उद्घाटन करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

कोल्हे पुढे म्हणाले की, एके काळी कोपरगांव हे हाॅलीबाॅलची पंढरी म्हणुन ओळखल्या जायचे. येथिल माजी खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट व्हाॅलीबाॅल खेळाच्या माध्यमातुन कोपरगांवची नवी ओळख करून दिली. आता या खेळाच्या माध्यमातुन कोपरगांवला गतवैभव प्राप्त करण्यासाठी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स कायम प्रयत्नशिल असणार आहे.

या खेळाचे आयोजक होण्याचा आंनद असल्याचे सांगुन कोल्हे म्हणाले की १८९५ मध्ये हाॅलीबाॅल खेळाची सुरूवात अमरिकेतुन झाली. १९५२ पासुन भारताचा संघ आंतरराष्ट्रीय  सामने खेळू लागला. हा खेळ सर्वच वयोगटातील खेळाडूंसाठी लोकप्रिय ठरला असुन आजही खेडोपाडी सुध्दा अनेक व्हाॅलीबाॅल प्रेमी सायंकाळी एकत्र येवुन हा खेळ खेळतात. सर्वांग व्यायामासाठी या खेळाकडे पाहीले जाते असे कोल्हे शेवटी म्हणाले.