कोपरगाव मतदार संघाच्या रस्त्यांसाठी १.८० कोटी निधी मंजूर – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ८ : कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या रस्ते विकासाला निधी मिळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून  जिल्हा नियोजन समितीकडून ३०५४ अनुदान योजने अंतर्गत रस्त्यांसाठी १ कोटी ८० लाख रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

            कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी अनेक महत्वाच्या रस्त्यांचे प्रश्न सोडविले आहेत. मतदार संघातील ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी १४० कोटी, कोपरगाव शहरातील रस्त्यांसाठी ५.३५ कोटी तसेच एन. एच. ७५२ जी या कोपरगाव जवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील सावळीविहीर ते कोपरगाव रस्त्यासाठी १७८ कोटी व विविध रस्त्यांवरील पुलांसाठी २९.४७ कोटी निधी आणला आहे. तरी देखील मतदार संघाच्या सर्वच  रस्त्यांचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरुच असून त्या पाठपुराव्यातून मतदार संघातील रस्त्यांसाठी १ कोटी ८० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.

            यामध्ये कोपरगाव तालुक्यातील घोयेगाव येथील इजिमा २१५ घोयेगाव-उक्कडगाव (ग्रा.मा.२६) रस्ता डांबरीकरण, धोत्रे इजिमा २१५ धोत्रे-वारी (ग्रा.मा.५८) रस्ता डांबरीकरण, अंजनापूर ग्रा.मा. ३० अंजनापूर कमान ते संगमनेर रोड ते चांगदेव गव्हाणे वस्ती रस्ता डांबरीकरण, पुणतांबा ग्रा.मा.५७ पुणतांबा रेल्वे गेट ते योगीराज चांगदेव महाराज मंदिर कमानपर्यंत रस्ता डांबरीकरण, कासली ग्रा.मा.७१ रा.मा.६५ कासली पाटी ते कासली गाव रस्ता डांबरीकरण, वाकडी ग्रा.मा. ६३ वाकडी चितळी रोड ते शिवाजी साबदे घर रस्ता डांबरीकरण,

मुर्शतपूर इजिमा १६० मुर्शतपूर कैलास शिंदे घर ते किरण देवकर घर (ग्रा.मा.३७) रस्ता खडीकरण, रवंदे येथील ग्रा.मा. १०२ जिल्हा परिषद शाळा ते महालखेडा (काळधोंडी नदी) तालुका हद्द रस्ता खडीकरण, पोहेगाव बु. ग्रा.मा.५२ बाळासाहेब वेताळ हॉटेल ते मयुरेश्वर शाळा रस्ता खडीकरण या रस्त्यांसाठी हा निधी मंजूर झाला आहे. मतदार संघातील उर्वरित रस्त्यांसाठी देखील निधी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरु असून या रस्त्यांसाठी लवकरात लवकर निधी आणून या रस्त्यांचाही विकास करणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.