दिवाळी हाट खरेदी उत्सवाचा नागरिकांनी लाभ घ्यावा – पुष्पाताई काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०५ : नागरिकांना दिवाळीच्या खरेदीसाठी आवशयक वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध होवून स्थानिक छोट्या मोठ्या व्यवसायिकांबरोबरच बचत गटाच्या महिलांनी तयार केलेले दिवाळीचे खाद्यपदार्थ व साहित्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने कृष्णाई मंगल कार्यालयात मागील वर्षापासून सुरु करण्यात आलेल्या ‘कोपरगाव दिवाळी हाट’ चे उदघाटन मंडळाच्या अध्यक्षा व गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका पुष्पाताई काळे यांच्या शुभहस्ते व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले असून नागरिकांनी खरेदीसाठी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन पुष्पाताई काळे यांनी केले आहे.  

प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असतात. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून मागील वर्षापासून नागरिकांना दिवाळीची खरेदी करणे सोयीस्करपणे करता यावी याविया उद्देशातून दिवाळीच्या खरेदीसाठी ‘कोपरगाव दिवाळी हाट’ हा खरेदी महोत्सव सुरु करण्यात आला. मागील वर्षी या ‘कोपरगाव दिवाळी हाट’ ला हजारो नागरिकांनी भेट देत मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यामुळे लाखो रुपयांची मोठी आर्थिक उलाढाल झाली आहे. यावर्षी देखील पहिल्याच दिवशी नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून यावर्षी देखील मोठी उलाढाल होणार असल्याचे संकेत मिळत आहे.

यावेळी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या सर्व सदस्या, माजी नगरसेविका प्रतिभा शिलेदार, वर्षा गंगूले, रमा पहाडे, उमा वहाडणे, चंपाबेन पटेल, पार्वतीबेन पटेल, सुनेत्रा कुलकर्णी, पुष्पलता सुतार, माधवी नेने, शैलजा रोहोम, जयश्री बोरावके, सुचिता घुमरे, वर्षा झवर, माहेश्वरी संवादिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सुरेखा बजाज, उपाध्यक्षा रुचिरा लाहोटी, सचिव राधिका मुंदडा, व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.